आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्यावतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 जणांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समितीमध्ये पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती
- 1) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
- 2) रामदास कदम, नेते
- 3) गजानन कीर्तीकर, नेते
- 4) आनंदराव अडसूळ, नेते
- 5) मीनाताई कांबळे, नेत्या
- 6) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
- 7) रवींद्र वायकर, खासदार
- 8) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार
- 9) राहुल शेवाळे, माजी खासदार
- 10) संजय निरुपम, माजी खासदार
- 11) प्रकाश सुर्वे, आमदार
- 12) अशोक पाटील, आमदार
- 13) मुरजी पटेल, आमदार
- 14) दिलीप लांडे, आमदार
- 15) तुकाराम काते, आमदार
- 16) मंगेश कुडाळकर, आमदार
- 17) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
- 18) सदा सरवणकर, माजी आमदार
- 19) यामिनी जाधव, माजी आमदार
- 20) दीपक सावंत, माजी आमदार
- 21) शिशिर शिंदे, माजी आमदार
या नेत्यांवर मुंबई महालिका निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. हीच समिती सर्व निर्णय घेईल असं पक्षा मार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. या समितीत सर्व मुंबईच्याच नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऐन वेळी पक्षात आलेल्या संजय निरूपम यांनाही या समितीत स्थान मिळाले आहे. शिवाय खासदार श्रीकांत शिंदे ही या समितीचा भाग आहेत. या शिवाय रामदास कदम,गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ या नेत्यांचा ही या समितीत समावेश करण्यात आला आहे. पण या समितीत शिवसेना ठाकरे गटातून आलेल्या कोणत्याही जेष्ठ नगरसेवकाचा समावेश करण्यात आलेला नाही.