Shivsena UBT: विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर, 'या' नावामुळे पेच निर्माण होणार?

उमेदवार शिवसेनेचा असला तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून ते उमेदवार होणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे
  • युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे
  • काँग्रेसने दानवे यांच्या नावाला पाठिंबा देणार की नाही याबाबत महाविकास आघाडीतील पुढील लक्ष आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

विधान परिषदेवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जाणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता होती. ठाकरें बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. संजय राऊत हे वारंवार उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेत जावे असे सांगत होते. पण आता उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार नाहीत हे निश्चित झाले आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे हे उमेदवार असतील असं जाहीर केले आहे. शिवाय ते उद्या गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज ही दाखल करणार आहेत. मात्र दानवे यांच्या नावाला काँग्रेस पाठींबा देणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. 

उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे उमेदवार असतील तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल असं या आधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता ठाकरे मैदानात असणार नाहीत हे निश्चित झालं आहे. अशा वेळी काँग्रेस काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने ही उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दानवे यांच्या नावाला काँग्रेस सहमती देणार का याबाबत उत्सुकता आहे. तसं झालं नाही तर पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेकडून दानवे हे जरी उमेदवार असले तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अस सांगितलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Cabinet decision:'साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर' राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या म्हणजे गुरूवारी शेवटचा दिवस आहे. त्या आधी शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दानवे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते राहीले आहेत. ठाकरे यांनी स्वत: परिषदेत न जाता आपल्या एका कार्यकर्त्याला संधी दिली आहे. त्याचा ही भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येवू शकतो. दानवे यांनी त्यांच्या कार्यकाळात शिवसेना ठाकरे गटासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. त्याचे बक्षिस त्यांना देण्यात आल्याची ही चर्चा आहे.  
 

Topics mentioned in this article