Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप

Anil Parab on Yogesh Kadam : विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anil Parab: आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केला आहे.
मुंबई:

Anil Parab on Yogesh Kadam : विधीमंडळ अधिवेशनाचा आज (18 जुलै) शेवटचा दिवस होता. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी खळबळजनक आरोप केला आहे. 'गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार आहे,' असा खळबळजनक आरोप कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना केला. राज्यात डान्सबारला बंदी आहे. त्यानंतरही हा बार सुरु असून त्याचं परमिट गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असल्याचा आरोप परब यांनी केला.

काय म्हणाले परब?

अनिल परब यावेळी बोलताना म्हणाले की, गृहमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था विषय आहे. महिलांच्या प्रतिष्ठा राखण्यासाठी सरकारनं कायदा केला आहे. पण, त्याचवेळी मुंबईतल्या कांदिवसीमध्ये सावली हा डान्सबार सुरु आहे. 

या डान्सबारवर 30 मे 2025 रोजी समतानगर पोलीस स्टेशननं रेड केली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. त्याची यादी देखील मी देतो, असं आव्हान परब यांनी दिलं. या प्रकरणात बारच्या 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा पंचनामा केला. त्यामध्ये त्या बारचं परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असून त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत, असा आरोप परब यांनी केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी या प्रकरणात कारवाई केली नाही, तर सरकारचा याला पाठिंबा आहे, हे सिद्ध होईल, असं परब यावेळी म्हणाले.

Advertisement

राज्यपाल सुरक्षित नाहीत

अनिल परब यांनी या भाषणात राज्यपालही सुरक्षित नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, 'आम्ही आज राज्यपालांकडे गेलो होतो. त्यावेळी आमच्या आमच्या पीएला खाली उतरवलं? राज्यपालांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सांगण्यात आलं. ज्यपाल सुरक्षित नसेल तर काय उपयोग? जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? असा सवाल त्यांनी केला. 

सचिन पाटील नावाचा आरटीओ अधिकारी आहे, त्याचा ड्रायव्हर कंत्राटी होता. त्याचं कंत्राट संपलं आहे तरी हा ड्रायव्हर आहे. अधिकाऱ्याचे कपडे घालून चलन कापत आहे. तो अधिकारी गाडीत बसतोय आणि त्याचा ड्रायव्हर मशीन हातात घेऊन चलन काढत आहे. मी याचे फोटो पाठवतो. त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी परब यांनी यावेळी केली. 
 

Advertisement
Topics mentioned in this article