Shivsena News: उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! आमदारांच्या बैठकीला किती जणांची हजेरी किती गैरहजर?

पक्षाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आता उद्धव ठाकरे यांच्यावर येवून ठेपली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारीपासून सुरू झाले आहे. त्या आधी शिवसेना ठाकरे गटाचे सहा आमदार फुटले आहेत. त्यामुळे या धक्क्यातून धडा घेत आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावध झाले आहेत. आपल्या सोबत असलेल्या आमदारांना आता एकत्र ठेवण्याचे त्यांच्या समोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवालय या पक्षाच्या कार्यालयात शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत किती जण हजर राहातात किती जण गैरहजर राहातात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार या बैठकीला विधानसभेचे 18 पैकी 15 आमदार उपस्थित होते. तर विधान परिषदेचे 5 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

नक्की वाचा - Parbhani News: भाजप- शिवसेनेचे 'खान' विधान परिषदेत! शिंदेंनी करून दाखवलं पण 'या' एका गोष्टीने किरकिरी वाढली

पक्षाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आता उद्धव ठाकरे यांच्यावर येवून ठेपली आहे. त्यामुळे ते स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यात शिंदे गटाने या पुढे ही मोठा राजकीय भूकंप येणार आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे आधीच सावध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. ठाकरेंची विधानसभेत 18 आमदार आहेत. त्या पैकी 15 आमदार हे या बैठकीला उपस्थित होते. त्यात खालील विधानसभेचे आमदार  हे हजर होते. यामध्ये तीन आमदार मात्र बैकीला येवू शकलेले नाहीत. 

Advertisement
  • 1. बाळा नर 
  • 2. नितीन देशमुख 
  • 3. सुनील राऊत 
  • 4. अजय चौधरी 
  • 5. प्रवीण स्वामी 
  • 6. गजानन लवटे 
  • 7. हारून खान 
  • 8. नितीन देशमुख 
  • 9. वरुण सरदेसाई 
  • 10. सुनील प्रभू 
  • 11. कैलास पाटील 
  • 12. आदित्य ठाकरे
  • 13. बाबाजी काळे 
  • 14. मनोज जामसुतकर 
  • 15.भास्कर जाधव 

विधानसभेच्या आमदारांपैकी संजय देरकर, राहुल पाटील आणि संजय पोतनीस हे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. वैयक्तीक कारणासाठी ते बैठकीला येणार नाहीत असं त्यांनी आधिच कळवलं होतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांना या बैठकीला अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या अनुपस्थिती आमदारांबाबत ही आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.   
 
विधान परिषदेच्या आमदारांना ही यावेळी बैठकीला बोलावण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या पाच आमदारांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. 
 
विधान परिषदेचे उपस्थित पाच आमदा पुढील प्रमाणे

  • 1. सचिन अहिर 
  • 2. ज मो अभ्यंकर
  • 3. मिलिंद नार्वेकर
  • 4. अनिल परब
  • 5. अंबादास दानवे