Shivsena Vs Ajit pawar: शिवसेनेचे मंत्री अजित पवारांविरोधात नाराज? एकनाथ शिंदें बरोबरच्या बैठकीत काय झालं?

या बैठकीत अजित पवार यांच्या विरोधात शिंदेंच्या सर्वच मंत्र्यांनी आवाज उठवल्याचं समजत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला संघर्ष थांबता दिसत नाही. दिवसेंदिवस हा संघर्ष तिव्र होताना दिसत आहे. राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची वेगळी बैठक झाली. ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यात त्यांनी आपल्या मंत्र्यांचे म्हणणे जाणून घेतले. शिवाय त्यांच्या अडचणी काय आहेत याची ही विचारणा केली. या बैठीक शिवसेना शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांना टार्गेट करत नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संघटनेचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे बैठका घेत आहेत. त्यात ते आपल्या मंत्र्यांच्याही बैठका घेतात. आज ही कॅबिनेट मिटींग संपल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यात यांच्या सर्वच मंत्र्यांनी अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजत आहे. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. यामुळे विकासकामांत अडथळा येतोय, अशी तक्रार या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?',अंधारे-चाकणकर यांच्यात जुंपली, एकमेकींना थेट...

या बैठकीत अजित पवार यांच्या विरोधात शिंदेंच्या सर्वच मंत्र्यांनी आवाज उठवल्याचं समजत आहे. अजित पवार अर्थमंत्री आहेत. असं असताना त्यांनी जर आम्हाला पैसे दिले नाहीत तर आम्ही कामे कशी करणार? असा सवाल मंत्र्यांनी उपस्थित केला आहे.  सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, अशी नाराजी मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढा अशी मागणी ही मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुटकेवर 'या' दिवशी होणार युक्तीवाद, कोर्टात आज काय काय घडलं?

यावर एकनाथ शिंदे यांनीही आपल्या मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे समजत आहे. याबाबत  मी स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यातून या समस्येचा तोडगा काढणार आहे, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिले. पण गेले कित्येक दिवस दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर महायुतीला तोडगा काढता आला नाही. तिथे ही शिवसेनेच्या मंत्र्यांचाच दावा आहे. असं असताना ही समस्या सोवण्यात एकनाथ शिंदे यांना अजूनही यश आलं नाही. त्यात आता ही निधी वाटपाचा पेच ते कसा सोडवणार हा खरा प्रश्न आहे.  दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेला निधी मिळत नाही अशी ओरड करण्यात आली होती. त्यानंतर सेनेत बंड झाले होते.  


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world