'मुख्यमंत्र्यांचं कार्ट', उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांनी रविवारी (6 ऑक्टोबर 2024) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. म्हात्रे डोंबिवलीमधून आगामी विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे यांनी 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा शिंदे यांचा उल्लेख केला होता. ठाकरे यांच्या टिकेला श्रीकांत शिंदे यांनी चोख उत्तर दिलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'ना घर का ना घाट का...'

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळला. पण, अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. आपलं पोरगं बाब्या आणि दुसऱ्याचं पोरगं कार्ट अशी म्हण आहे. आपल्या बाब्यानं 2-2 आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून संघर्ष करुन निवडून आलोय.

लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये लढा असं आव्हा न दिलं होतं, पण ते पळून गेले, निवडणूक लढले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली आहे. काँग्रेसच्या मतावर त्यांच्या जागा निवडून आल्या. आगामी काळात काँग्रेस त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का', असं उत्तर शिंदे यांनी दिलं आहे. 

( नक्की वाचा : 'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप )

कोण किती जागा लढवणार?

विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहे. कुणाला कोणती जागा सुटणार हे लवकरच कळेल. कोण किती जागा लढेल यापेक्षा महायुती सरकार कसं येईल हे महत्त्वाचं आहे, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

बच्चू कडूंवर बोलणं टाळलं

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्याबाबत बोलणं शिंदे यांनी टाळलं. 'कुणाच्या नेतृत्त्वाखाली काम करायचं हे त्या आमदारावर अवलंबून असतं,' इतकीच प्रतिक्रिया शिंदे यांनी या विषयावर दिली. 
 

Topics mentioned in this article