दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला असून त्यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पाच महिन्यापासून केजरीवाल हे तुरूंगात होते. दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्यात त्यांनी इडीने अटक केली होती. हा जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती कोर्टाने घातल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीच्या कथित मद्यविक्री घोटाळ्यात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध केला होता. ईडीने दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश हा एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला 21 जूनला स्थगिती दिली होती.
ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जवळपास 177 दिवसानंतर केजरीवाल तुरूगाच्या बाहेर येणार आहेत. शिवाय त्यांना 10 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला होता. प्रचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा तरूंगात जावे लागले होते. आता त्यांना रितसर जामीन मिळाला आहे.