उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांची काही वक्तव्य ही वादग्रस्त असतात, तर काही वक्तव्य संभ्रम निर्माण करणारी असतात. त्यात त्यांनी आता आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात आहे. हे वक्तव्य त्यांनी लाडकी बहीण योजने बद्दल केले. पुणे जिल्ह्यातील खेड इथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. लाडकी बहीण योजनेचा सर्वात जास्त लाभ हा पुणे जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. जवळपास 1 लाख 3 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. हे सांगत असताना पुढे अजित पवार जे काही म्हणाले त्याचीच चर्चा सर्वत्र होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुढे बोलताना ते म्हणाले लाडकी बहीण योजनेचा फायदा एका वेळी एकाच महिलेला घेता येणार आहे. पण असं एक प्रकरण समोर आलो की आम्हीच हबकून गेले. एका नवरा आणि बायकोने जवळपास 26 अर्ज केले होते. असं करणं म्हणजे आम्हाला बांबू लावायचे काम करत आहेत. असं म्हणत योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे झापलं. सरकारची देण्याची दानत आहे. सर्वांना लाभ घ्या. पण खोट्या गोष्टी करू नका. तसं केलं तर चक्की पिसिंग करायला लावल्या शिवाय राहाणार नाही असे अजित पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत गॅस गळती
यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दिलीप मोहीते पाटील यांचे कौतूक केले. गेल्या पाच वर्षात दिलीप मोहीते यांनी भरपूर काम केले आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर दिलीप मोहीतेंची उमेदवारी पक्की असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय निवडून आल्यानंतर दिलीप मोहीते हे मंत्री असतील अशी घोषणा ही त्यांनी करून टाकली. गेल्या पाच वर्षात मतदार संघात साडेचार हजार कोटीचा निधी मोहीते यांनी आणल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. असं काम आधी कोणीही केलं नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - अदाणी ग्रुपनं हिंडेनबर्गचे स्वीस अकाऊंटबद्दलचे नवे आरोप फेटाळले
दरम्यान या कार्यक्रमाच्या काही बॅनरवर खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो होता. यावर ही अजित पवार म्हणाले. अमोल कोल्हेंचा फोटो लावल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. बातम्या पेरल्या गेल्या. अमोल कोल्हे हे इथले खासदार आहेत. हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे प्रोटोकॉल नुसार त्यांचा फोटो छापला असंही ते म्हणाले. दरम्यान आपली जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे काम सुरू आहे. पण आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी कोणाचेही घोडे मारले नाहीत. पण विनाकारण बातम्या पेरून बदनामी करण्याचे काम सध्या सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world