जाहिरात

Actor Vijay TVK:थलपती विजयने सरकार स्थापनेसाठी मागितला काँग्रेसकडे पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?

दरम्यान विजय यांनी तामिळनाडूमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना फोन केला होता.

Actor Vijay TVK:थलपती विजयने सरकार स्थापनेसाठी मागितला काँग्रेसकडे पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?
  • तमिळगा वेत्री कळघमने १०८ जागा जिंकून तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे
  • विजय यांनी बहुमतासाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला असून काँग्रेसने सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवली आहे
  • काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांच्या माहितीनुसार तामिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटी उद्या अंतिम निर्णय घेईल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 चे निकाल जाहीर झाले आहे. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हा पक्ष 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला आहे. याची माहिती काँग्रेस नेते के. सी वेणूगोपाल यांनी दिली आहे. विजय यांनी काँग्रेसला पाठींबा देण्याची विनंती केली आहे असं वेणूगोपाल म्हणाले. काँग्रेस ही याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. 

काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले की, विजय यांनी सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला आहे. दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर वेणुगोपाल म्हणाले, "आम्हाला तामिळनाडूत भाजपची राजवट नको आहे. येथील जनतेने धर्मनिरपेक्ष सरकारसाठी कौल दिला आहे. मात्र, टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय तामिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटी (TNCC) घेईल." यासाठी उद्या सकाळी 9:30 वाजता चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे याबाबचा निर्णय उद्या बुधवारी होईल. 

नक्की वाचा - Tamil Nadu Election 2026: 'थलपती' विजय देणार आमदारकीचा राजीनामा! काय आहे कारण?

विजय यांच्या पक्षाने 108 जागांसह राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा मांडला आहे. बहुमतासाठी त्यांना अजून 10 जागांची आवश्यकता आहे. विजय यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, तरुण आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर विजय यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपला सविस्तर अहवाल हायकमांडला सादर केला असून पुढील पावले सामूहिकपणे उचलली जातील. सध्याचा काँग्रेसचा मुड पाहाता विजय यांना काँग्रेस पाठिंबा देईल. तसे झाल्यास विजय यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 113 होईल. डाव्या पक्षांचे ही चार आमदार आहे. त्यामुळे काँग्रेसने पाठिंबा दिल्यास विजय यांना बहुमताचा आकडा गाठणे सोपे होणार आहे.  

नक्की वाचा - Actor Vijay: तमिळनाडूचा नवा धुरंधर! विजयच्या 'विजया'ची 5 कारणं, कोणती आश्वासनं ठरली गेमचेंजर?

काँग्रेस याबाबत बुधवारी निर्णय घेईल. दरम्यान विजय यांनी तामिळनाडूमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना फोन केला होता. शिवाय त्यांचे अभिनंदन ही केले होते. त्याबाबचे ट्वीट राहुल गांधी सोबतच विजय यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस विजय यांना पाठिंबा देईल अशी स्थिती आहे. शिवाय विजय यांनी ही कोणत्या ही स्थिती भाजप सोबत जाणार नाही अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेसला विजय यांना पाठिंबा देण्या शिवाय पर्याय राहीला नाही. मात्र उद्या काँग्रेसचा काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com