जाहिरात

'प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान 2 अपत्य जन्माला घालावे' विश्व हिंदू परिषदेने कारण सांगितले

गोविंद शेंडे हे आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोव्याच्या क्षेत्र मंत्रीपदाची जबाबदारी आहे.

'प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान 2 अपत्य जन्माला घालावे' विश्व हिंदू परिषदेने कारण सांगितले
पणजी:

प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान दोन अपत्य जन्माला घालावीत. तसं केलं तरच भविष्यातील देशातील लोकशाही कायम राहील असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले आहे. देशात बहुसंख्य हे जर हिंदू असतील तरच देशातील लोकशाही कायम राहील असेही ते म्हणाले. गोविंद शेंडे हे आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोव्याच्या क्षेत्र मंत्रीपदाची जबाबदारी आहे. काही दिवसा पूर्वी शेंडे यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही वक्तव्य केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लिव्ह इन रिलेशनमध्ये अपत्य होत नाहीत. किंवा ती जोडपी अपत्य जन्माला घालण्यास उत्सुक नसतात. शिवाय लग्न केलेली जोडपीही  एकच अपत्य जन्माला घालण्याची प्रथा पाडत आहेत. किंबहूना तशी प्रथाच आली आहे. मात्र हिंदूंची संख्या बहुसंख्य राहील तेव्हाच देशात लोकतंत्र सुरक्षित राहील. म्हणून प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान दोन अपत्ये जन्माला घालावी, असे मत गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय त्यांनी बांगलादेशातील हिंदूना बाबतही वक्तव्य केले आहे. बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. फाळणीच्या वेळी बांगलादेशात हिंदूंची संख्या 32 टक्के होती. ती आता 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंना भारतात शरण द्यावे असेही ते म्हणाले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं, आता...' दादांचा वादा अन् आवाहनही

विश्व हिंदू परिषदेच्या याच गोविंद शेंडे यांनी काही दिवसा पूर्वी लाडकी बहिण योजनेबाबतही असेच वक्तव्य केले होते. ज्यांना दोन बायका आहेत, शिवाय दोन मुलां पेक्षा जास्त मुलं आहेत अशाना या योजनेचा लाभ देवू नये अशी मागणी त्यांनी केली होती. शिवाय या योजनेचा फायदा असेच लोक उचलत आहेत, त्यांना दोन किंवा दोन पेक्षा जास्त बायका आहे. दोन पेक्षा जास्त मुलं आहेत. त्यामुळे अशा लोकांना सरकारने नियम करून अपात्र करावे असे ते म्हणाले होते. 

ट्रेंडिंग बातमी - पवार विरहीत राजकारणाचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न ? दूरदृष्टी ठेवत दिल्ली दौऱ्याची आखणी

यायोजने बाबत बोलताना लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दाही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. ज्यांना सरकारी लाभ घ्यायचे आहेत त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाची अमंलबजावणी करणे गरजेचे आहे असे म्हटले होते. शिवाय लोकसंख्या नियंत्रीत करण्यासाठी काही ना काही बंधने घालणे गरजेचे आहे. हा राष्ट्रीय हिताचा हा विषय आहे. याला कोणत्याही धार्मिक भावनांशी जोडू नका. आम्हाला लोकसंख्या नियंत्रीत करायची आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र आता तेच हिंदू जोडप्यांनी किमान दोन अपत्यांना जन्माला घालावे असे आवाहन केले आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
..... तर 288 जागा लढवू, किशोरी पेडणेकर यांचा काँग्रेसला इशारा
'प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान 2 अपत्य जन्माला घालावे' विश्व हिंदू परिषदेने कारण सांगितले
Manoj Jarange Patil will visit Rajkot Fort in Sindhudurga on 1 September
Next Article
मनोज जरांगे 'राजकोट'ला जाणार, वातावरण आणखी तापणार?