अधिवेशन वादळी होणार? विरोधकांनी दाखवली झलक, पोस्टरमधून सत्ताधाऱ्यांना घेरलं

विरोधकांनी शिंदे-फडणवीस- पवार सरकार विरोधात बॅनरबाजी केली आहे.यातून सरकाला चिमटे तर काढलेच आहे पण राज्याचे पुढचे राजकारण कसे असेल याचाही झलक बॅनरच्या माध्यमातून दाखवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरूवारपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्या आधीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरणं सुरू केले आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस- पवार सरकार विरोधात बॅनरबाजी केली आहे.यातून सरकाला चिमटे तर काढलेच आहे पण राज्याचे पुढचे राजकारण कसे असेल याचाही झलक बॅनरच्या माध्यमातून दाखवली आहे. अधिवेशना पुर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या ठिकाणीच ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

बॅनरमधून सत्ताधाऱ्यांना प्रश्न

महाराष्ट्र परमो धर्म असा उल्लेख करत विधानसभेत परिवर्तन घडवणार महाराष्ट्र! असा बॅनर दर्शनीस्थळी लावण्यात आला आहे. लोकसभेत संविधनसाठी लढलो, विधानसभेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू असे बॅनरही लावण्यात आले आहे. यातून विधानसभेला विजयाचा विश्वास आणि निश्चय व्यक्त करण्यात आला आहे. भविष्याची दिशा सांगत असताना महायुती सरकारवरही टिका करण्यात आली आहे. 'राज्यातील महायुती सरकारचे आजचे चित्र म्हणजे, महाभ्रष्टाचारी महाघोटाळेबाज, महाटेडरबाज महायुती सरकार असा उल्लेख करत हल्लाबोल करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास

व्यंगचित्रातून महायुती सरकारवर हल्लाबोल

बॅनरवर व्यंगचित्रही काढण्यात आले आहे. हे व्यंगचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात एका रिक्षामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस चिंतेत बसलेले दाखवले आहेत. तर अजित पवार ही रिक्षा पकडत बाहेरच्या बाजूला लटकताना दिसत आहेत. सध्या महायुतीमध्ये सर्व काही ठिक चालले नाही असा सांगण्याचा प्रयत्न यातून केला आहे. विरोधकांनी यातून अधिवेशनात आपली भूमीका काय असेल याची चुणूक दाखवली आहे. 

Advertisement