महायुती सरकारचा शपथविधी झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवारांनी शपथ घेतली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते मंत्रिपदावर. अनेक इच्छुकांनी त्यासाठी मोर्चे बांधणीही केली आहे. मात्र त्या आधी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी चांगली खाती आपल्या पदरात कधी पडतील यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. काही खात्यांवरून महायुतीत अजूनही ओढाताण सुरू आहे. त्यावर तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही अशी स्थिती आहे. त्यात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. अशा वेळी भाजपने काही खात्यांची आदलाबदल करण्याची तयारी दर्शवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी झाले.त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. पण त्यांना खाते कोणते मिळणार हे अजूनही स्पष्ट नाही. एकनाथ शिंदे हे गृह खातं मिळावं यासाठी ठाम आहेत असं समजत आहे. पण भाजप हे खातं सोडण्याच्या तयारीत नाही. गृह खात्याच्या बदल्यात अन्य खातं देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. त्यानुसार खात्यांची आदलाबदली होवू शकते. गृह खात्याच्या बदल्यात महसूल खातं शिवसेना शिंदे गटाला देण्याची दाट शक्यता आहे. तशी ऑफर दिल्याची सुत्रांची माहिती आहे. आता ही ऑफर शिवसेना स्विकारणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
ट्रेंडिंग बातमी - 'पक्षाने माझी किंमत केली पाहिजे' भाजपचे सर्वात सिनिअर आमदार थेट बोलले
नागपूर अधिवेशना आधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस खाते वाटपाची चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला कोणती खाती येणार आणि मित्र पक्षाला कोणती याचे सुत्र अजूनही अंतिम झालेले नाही. पुढील दोन दिवस त्यावर चर्चा होईन निर्णय घेतला जाईल. उर्जा, उद्योग, महसुल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य या खात्यांची आदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ; भाजप आक्रमक
मात्र कोणाच्या वाट्याला कोणतं खातं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मागित सरकार मधील काही खाती त्याच पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे. पण चांगली खाती मिळावी यासाठी तिन्ही पक्षा आग्रही आहेत. पुढील दोन दिवसात त्याबाबत निर्णय होईल. गृहखात्यावर आता पेच अडकला आहे. शिंदेंना हे खातं काही करून हवं आहे. तर देवेंद्र फडणवीसांना हे खातं आपल्याकडे ठेवायचे आहे. अशा वेळी महसूल, नगरविकास यासारखी खाती शिंदेंना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.