Tamil Nadu: TVK चे 108 आमदार राजीनामा देणार? तामिळनाडूत राजकीय भूकंप, सत्तासंघर्ष पेटला

काँग्रेसने TVK ला पाठिंबा जाहीर केला असला, तरी डाव्या पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • तामिळनाडू विधानसभेतील त्रिशंकू परिस्थितीमुळे DMK, AIADMK आणि TVK यांच्यात सत्तेसाठी संघर्ष अधिकच वाढलाय
  • TVK आपल्या सर्व 108 आमदारांसह एकाच वेळी राजीनामा देण्याचा विचार करत आहेत
  • DMK ने एम.के. स्टॅलिन यांना तातडीचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून यामुळे TVK मध्ये अस्वस्थता आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

तामिळनाडूच्या राजकारणात बहुमताचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच आता सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे. जर DMK किंवा AIADMK ने सरकार स्थापनेचा प्रयत्न केला, तर TVK आपले सर्व 108 आमदार एकाच वेळी राजीनामा देण्याचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तेचे समीकरण जुळवताना राजकीय पक्षांची दमछाक होत आहे. 

DMK आणि AIADMK मध्ये छुप्या युतीची चर्चा
राज्यात 108 जागा जिंकूनही TVK ला बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यात अडचणी येत आहेत. अशातच कट्टर प्रतिस्पर्धी असलेले DMK आणि AIADMK, TVK ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. एम.के. स्टॅलिन यांना तातडीचे निर्णय घेण्याचे अधिकार DMK ने दिल्याने TVK च्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. अशा स्थितीत आक्रमक भूमीका टीव्हीकेने घेण्याचा निर्णय केला आहे. टीव्हीकेला अजूनही आपण बहुमताचा आकाडा गाठू असं वाटत आहे.   

Advertisement

नक्की वाचा - Tamil Nadu Election: थलपती विजय मॅजिक फिगरच्या जवळ! तामिळनाडूत पडद्या मागे काय-काय घडतयं?

पक्षांची स्थिती आणि हालचाली
AIADMK ने आपल्या आमदारांना दोन दिवस शांत राहण्यास सांगितले आहे. तर DMK ने आपल्या आमदारांना चेन्नई सोडू नका असे आदेश दिले आहेत. राज्यात सध्या कमालीचा तणाव आहे. DMK ने आपल्या आमदारांना चेन्नईतच राहण्याचे फर्मान काढले आहे, तर दुसरीकडे AIADMK ने आपल्या आमदारांना पुढील 48 तास शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. 108 जागा जिंकणाऱ्या TVK कडे 5 जागा असलेल्या काँग्रेसचे समर्थन आहे, पण बहुमताचा आकडा अजूनही दूर आहे. अशातच विरोधकांनी हालचाली सुरू केल्यामुळे तामिळनाडूत पुन्हा एकदा निवडणुका होणार की नवीन राजकीय समीकरण उदयास येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नक्की वाचा - Success Story: कमालच केली! पान विकून बनला करोडपती, 400 दुकाने अन् 7 कोटींची उलाढाल

काँग्रेसने TVK ला पाठिंबा जाहीर केला असला, तरी डाव्या पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. डाव्या पक्षांचे चार आमदार आहेत. त्यानंतर ही दोन जागा बहुमतासाठी कमी पडणार आहेत. अशा स्थिती विजय यांना जुळवा जुळव करावी लागत आहे. काँग्रेसचा पाठिंबा असतानाही बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्याचे मोठे आव्हान सध्या उभे राहिले आहे. डावे पक्ष आणि इतर छोटे पक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतात, यावरच राज्याचे भवितव्य अवलंबून आहे.

निवडणुकीचे निकाल (एकूण जागा):

  • 1. TVK: 108
  • 2. DMK: 59
  • 3. AIADMK: 47
  • 4. काँग्रेस: 5
  • 5. PMK: 4
  • 6. भाजप, DMDK, AMMK: प्रत्येकी 1
  • 7. डावे पक्ष - 4