पालघर लोकसभेची जागा महायुतीत नक्की कोणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट झालेलं नाही. अशात आता एक नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहेत. त्यातून ते कसा मार्ग काढणार याकडे सर्वाचं लक्षा लागलं आहे. सध्या हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. राजेंद्र गावीत हे विद्यमान खासदार आहेत. पण त्यांच्याबाबत नाराजी आहे. तर दुसरीकडे भाजपनं हा मतदार संघ आपल्याकडे यावा यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे शिवसेना की भाजप, उमेदवार कोण? यामध्ये पेच फसला आहे.
पालघर वरून नवा पेच?
पालघर लोकसभेत महायुतीकडून शिवसेना लढणार की भाजप याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहे. अशातच महायुतीच्या स्थानिक प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पालघरचा खासदार हा स्थानिकच असावा अशी मागणी करण्यात आली. शिवाय विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांच्या विरोधातही सुर निघाले. या मतदार संघातून निवडणूक लढण्यास आमदार श्रीनिवास वणगा इच्छुक आहे. आमदार श्रीनिवास वनगा हे स्थानिक असून शिंदे गटात आहेत. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांचे ते सुपुत्र आहेत. वणगा हे इच्छुक असल्यानं विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांची कोंडी झाली आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.
भाजपचाही मतदार संघावर दावा
पालघर हा तसा भाजपचा गड. मात्र मागील निवडणुकीत हा मतदार संघ भाजपनं शिवसेनेसाठी सोडला. शिवाय राजेंद्र गावीत हे आपले उमेदवारही शिवसेनेला देवू केले. त्यांचा विजयही झाला. आता शिवसेनेत फुट पडली आहे. राजेंद्र गावीत हे शिंदेंबरोबर आहेत. असं असलं तरी हा मतदार संघ महायुतीत अजूनही कोणाच्या वाट्याला गेलेला नाही. मात्र भाजपनं हा मतदार संघ मिळावा म्हणून जोर लावला आहे. माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा मुलगा डॉ. हेमंत सावरा, विलास तरे यांनी भाजपकडून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मतदार संघ कोणाचा यावरू सध्या वाद सुरू आहे.
राजेंद्र गावितांचा पत्ता कट होणार?
पालघरमध्ये सध्या राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चिंतामण वणगा यांचा मुलगा आमदार श्रीनिवास वणगा यांनीही खासदारकीसाठी दावेदारी केली आहे. त्यामुळे मतदार संघ मिळवण्याबरोबरच उमेदवारी कोणाला द्यावी यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले आहेत. राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध आहे. भाजपच्याही नेत्यांचा त्यांना विरोध आहे. राजेंद्र गावित हे मुळचे काँग्रेसचे आहे. काँग्रेस सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते.
भाई ठाकूरांची भूमिका महत्वाची
पालघर लोकसेभेती तिन विधानसभा मतदार संघावर भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. त्यामुळे या लोकसभेत त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. महायुतीकडून ही जागा आपल्याला मिळावी अशी त्यांची मागणी आहे. तसं न झाल्यास ते स्वतंत्र निवडणूक लढवू शकतात. याआधी यामतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी विजय मिळवलेला आहे.
मतदार संघात कोणाचा दबदबा?
पालघर लोकसभेत डहाणू, पालघर, बोईसर, वसई, नालासोपार, विक्रमगड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी तिन मतदार संघावर सध्या भाई ठाकूरांचं वर्चस्व आहे. एक मतदारसंघ माकपकडे तर एक शिवसेना शिंदेगटाच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे एक मतदार संघ आहे. विधानसभेत भाजपचा एकही आमदार नसला तरी लोकसभेत मात्र भाजपची मोठी ताकद आहे.