एका टीव्ही शोच्या डिबेट शोमध्ये बीआरएस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे दोन्ही पक्षातील राजकीय तणाव ही वाढला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तेलंगणाच्या YOYO टीव्ही या YouTube चॅनलवरील हा डिबेट शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चर्चेदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही प्रवक्त्यांमध्ये हाणामारीही झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या चर्चेत काँग्रेस पक्षाकडून देवनी सतीश सहभागी झाले होते. तर बीआरएसकडून गौतम प्रसाद सहभागी झाले होते. या चर्चे दरम्यान सतीश यांनी वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर परिस्थिती चिघळली. सतीश यांनी केलेल्या आरोपाला बीआरएसच्या गौतम प्रसाद यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देता आले नाही. ते त्यामुळे प्रचंड रागावले होते. ते काँग्रेसच्या देवनी सतीश यांच्यावर कठोर शब्दांचा मारा करत होते. त्याच वेळी त्यांचे स्वत: वरील नियंत्रण सुटले. त्यांनी थेट सतीश यांच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार लाईव्ह सुरू होता. तो सर्वांनी पाहिला.
आता या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी बीआरएसवर तर्कशुद्ध वादविवाद करण्याऐवजी हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला आहे. बीआरएसला पाठिंबा देणाऱ्या एका सोशल मीडिया हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय या व्हिडीओत रिपोर्टिंगमध्ये पक्षपाताचा आरोप करण्यात आला. त्यांनी काँग्रेस नेत्याचे नाव स्पष्ट पणे घेतले आहे. पण त्याच वेळी बीआरएसच्या प्रसाद यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे असं या युजर्सने म्हटलं आहे.
बीआरएसच्या प्रवक्त्याने केलेल्या या कृतीचा अनेक जण निषेध ही करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बीआरएस कार्यकर्त्यांवर ठोस वादविवाद टाळून हाणामारी करण्यावर भर दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या व्हिडीओमध्या वाद वाढताना दिसत आहे. त्याच वेळी बीआरएस प्रवक्त्याने थेट कानशिलात लगावल्याचं दिसत आहे. स्टुडीओत अँकर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे नेत्यांचे दे दणा दण सुरूच होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.