जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा पराभव का झाला? याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
S
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा पराभव का झाला? याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे. या निवडणुकीच्या निकालावर पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का झाला पराभव?

जयंत पाटील यांच्याबद्दल आमचा (महाविकास आघाडी) एकत्र निर्णय झाला नव्हता. आम्ही लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. शेतकरी कामगार पक्षानं लोकसभेसाठी जागा मागितली होती. त्यावेळी जागा देता येत नव्हती म्हणून विधान परिषदेत जयंत पाटील यांना संधी दिली. 

'आमच्याकडं 12 मतं होती. उद्धव ठाकरेंनी त्यांचा उमेदवार दिला. काँग्रेसनं पहिल्या पसंतीची मतं घ्यावी. दुसऱ्या क्रमांकाची मत इतर दोन्ही उमेदवारांना समसमान द्यावी, असा प्रस्ताव मी सांगितला होती. मी दिलेलं गणित काँग्रेसला मान्य झालं नाही. मी सांगितलं असतं तसं झालं असतं तर आमचा उमेदवार विजयी झाला असता. विधानपरिषद निवडणुकीत आमची रणनिती चुकली,' असं पवार यांनी स्पष्ट केलं. 

( वाचा : Vidhan Parishad Election Result : महाविकास आघाडी फुटली! वाचा कोणत्या आमदारांनी दिला धक्का )

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले होते. तर जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केलं होतं. या आमदारांवर कारवाई करणार असल्याचंही पटोले यांनी जाहीर केलंय.