Viral Video: व्हिडीओत दिसणारी ही खासदार कोण आहे ? दोघांमध्ये नेमकी काय बातचीत झाली ?

Saugata Roy and June Malia Video: एका युजरने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना टॅग करत म्हटलंय की, "सर, तुम्हाला आता कॉम्पिटीशन मिळाली आहे."

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभेच्या कामकाजादरम्यान तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार सौगत राय आणि जून मालिया यांच्यातील संवादाची एक छोटी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. लोकसभेत चंद्र शेखर आझाद हे 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कोड (दुरुस्ती) विधेयकावर भाषण करत असताना, त्यांच्यामागे हे दोन्ही खासदार गप्पा मारताना बघायला मिळाले होते.  

व्हिडीओ झाला व्हायरल
 
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मिश्किल कॉमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, "असं दिसतेय की मागे बसलेले लोकं त्यांचा स्वतःचा 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा करत आहेत." दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "संसदेतही व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे," तर तिसऱ्याने "व्हॅलेंटाईन डेची तयारी" अशी कॉमेंट केली आहे.  एका युजरने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना टॅग करत म्हटलंय की, "सर, तुम्हाला आता कॉम्पिटीशन मिळाली आहे."  दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटले होते, "व्हॅलेंटाईन डेसंदर्भात विशेष चर्चा सुरू आहे वाटतं." अन्य एकाने म्हटले की , "आम्ही याचसाठी टॅक्स भरतो का?"

सौगत रॉय आणि जून मालिया काय बोलत होते ?

सोशल मीडिया युजर्सनी या आझाद करत असलेले भाषण आणि त्यांच्यामागे बसून खासदार मारत असलेल्या गप्पा यातील विरोधाभास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यावेळी हे दोन खासदार गप्पा मारत होते, त्यावेळी चंद्रशेखर आझाद हे दलित कामगारांच्या हक्कांबद्दल बोलत होते.  हा व्हिडीओ गुरुवारचा असून, या व्हायरल व्हिडिओवर सौगत राय किंवा जून मालिया यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू होती, हे कळू शकलेलं नाही.  

कोण आहेत जून मालिया?

जून मालिया या अभिनेत्री असून त्यांनी बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. त्यांनी 2024 मध्ये पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढली असून पहिल्याच प्रयत्नात त्या खासदार झाल्या आहेत.  दार्जिलिंगमध्ये 24 जून 1972 रोजी जन्मलेल्या 51 वर्षीय जून मालिया यापूर्वी मेदिनीपूर मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यांनी 'मेरी प्यारी बिंदू' (2017) या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या आईची भूमिका साकारली होती.

Advertisement
Topics mentioned in this article