विशाळगडावरील अतिक्रमण : राजे विरुद्ध महाराज? राजघराण्यातील वादाची राज्यात चर्चा

Sambhajiraje Chhatrapati vs Chhatrapati Shahu Maharaj : विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू असताना कोल्हापूरच्या राजघरणातल्या वादाने चर्चेला तोंड फुटलं आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
S
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी 

कोल्हापूरमधल्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा वाद अजूनही ताजा आहे. पण, याच वादाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शाहू राजघराण्यातील मतभेद मात्र प्रकर्षाने पुढे आले आहेत.  संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात हिंसाचार झाला. एकीकडे अतिक्रमणाविरोधातली कारवाई सुरू असताना आता दुसरीकडे राजघरणातल्या  या वादाने चर्चेला तोंड फुटलं आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा वारसा सांगणारं, शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाचा अभिमान सांगणारं, अंबाबाईच्या आशीर्वादाचा महिमा गाणारं, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून मिरवणारं शहर म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरच्या याच आदर्शाला, अभिमानाला रविवारी गालबोट लागलं. 

विशाळगडावरील अतिक्रमणं हटवावीत यासाठी रविवारी आंदोलन झालं. संभाजीराजे छत्रपती यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. या आंदोलनाची धग विशाळगडापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर गावाला बसली. या आंदोलनात या गावात जाळपोळ झाली. घरांचं नुकसान झालं. हा विध्वंस पाहण्यासाठी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती गजापूरमध्ये पोहोचले. त्यावेळी शाहू महाराज तिथं जे बोलले त्यातून राजघराण्यातील मतभेद समोर आले. 

( नक्की वाचा : संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर )
 

संभाजीराजे छत्रपती यांचा राजकीय प्रवास

कोल्हापूरचं राजकारण आणि कोल्हापूरच्या राजघराण्याचा जवळचा संबंध आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनात सहभाग घेतला. राज्यभर दौरे केले, न्यायालयात आरक्षणाचा मुद्द्यावर लढा दिला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीऐवजी तारखेनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला.

Advertisement

राज्यात 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यावर संभाजीराजेंची भाजपाशी जवळीक वाढली. 2016 साली संभाजीराजे छत्रपतींची राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाली.   त्यांची मुदत 2022 साली संपली. त्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. तेव्हापासूनच ते संधीच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर  त्यांनी स्वराज्य या राजकीय पक्षाची स्थापना केली.

( नक्की वाचा : विशाळगडावर गेल्यावर मी घाबरलो होतो! संभाजी राजेंना जे दिसलं ते भयानक होतं )
 

2024 मधील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राजघराण्यातच तिकीट दिलं. संभाजीराजेंऐवजी त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी दिली. शाहू महाराज छत्रपतींनी काँग्रेसच्या तिकीटावर लढणार असं सांगितलं. ते लोकसभा निवडणुकीत विजयी देखील झाले.  संभीजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती हे पुरोगामी विचारांसाठी ओळखले जातातसंभाजीराजेंची भाजपशी असलेली जवळीक हे दोघांमधील वादाचे मुख्य कारण मानले जाते..  विशाळगडावरील हिंसाचारानंतर शाहू महाराजांनी संभाजीराजांचा निषेध करणारं पत्रकच काढलं आणि वादात आणखी एक ठिणगी पडली

Advertisement

संभाजीराजे छत्रपती हे सहा वर्षे खासदार होते. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षही होते.त्याच काळात त्यांनी विशाळगडाच्या मुद्द्यावर का आवाज उठवला नाही ? असा सवालही सध्या महाविकास आघाडीकडून केला जातोय.

विशाळगडावरचं अतिक्रमण हा सध्या राजकीय मुद्दा बनलाय. संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनात अतिक्रमणांवर नाही तर गोरगरीबांच्या घरावर दगडफेक झाली. या संपूर्ण प्रकरणाने पुरोगामी शाहू राजघराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याच प्रश्नांमध्ये राजे विरूद्ध महाराज या वादाची भर पडलीय.

Advertisement