विधानसभेला कोण बाजी मारणार? विश्वजित कदमांच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या

विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राज्यात होईल. अशा वेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पंढरपूर:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. 48 पैकी 31 जागा जिंकत महायुतीला जोरदार दणका दिला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मात्र महायुतीने बाजी मारली. शिवाय शेवटच्या अधिवेशनात लोकप्रिय घोषणा करत डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केला. त्यामुळे होवू घातलेली विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राज्यात होईल. अशा वेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणूक कोण जिंकेल याबाबत त्यांचे हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या यावक्तव्याने सर्वांच्याच भूवया मात्र उंचावल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीचा निकाल देशाने पाहीला. महाराष्ट्राचा जनाधार कोणाच्या बाजूने आहे हेही समजले. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे महाविकास आघाडीने गाफील राहून चालणार नाही.लोकसभेतील यशाने हुरळून जाण्याची गरज नाही.  महाविकास आघाडीला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्षांना त्याच बरोबर उमेदवारांनाही मेहनत घ्याली लागेल. जर मेहनत घेतली गेली तर लोकसभे पेक्षा चांगला निकाला पाहायला मिळेल असे विश्वजित कदम म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - ...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

शिवाय सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही असेही विश्वजित कदम म्हणाले. लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशाने पाहीले की सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीतही सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद दिसून येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर विश्वजित कदम यांच्या रूपाने काँग्रेसला आणखी एक तरूण आणि आक्रमक चेहरा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  शिंदे -फडणवीसांची कोंडी? '...तर मुंबईत धडकणार', हाकेंनी पण ठणकावले

माजी मंत्री विश्वजीत कदम पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी बाबत वक्तव्य केले. शिवाय भाजपमध्ये जाणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. सांगलीची जागा निवडून आणली आहे त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement