तुमच्या आमदाराचा पगार किती? भत्ते किती मिळतात? ही बातमी नक्की वाचा

आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. ऐवढा सर्व खटाटोप करणाऱ्या आमदारांना पगार तरी किमी मिळतो याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवशनाला विधानसभे बरोबरच विधानपरिषदेचे आमदारही हजेरी लावणार आहे. आमदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करावी लागते. कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. पराभव झाल्यानंतरही सामाजिक जिवनात कार्यरत रहावे लागते. संघर्षानंतर हे नेते विधानसभेची किंवा विधानपरिषदेची पायरी चढतात. एकदा तरी आमदार व्हावं अशी प्रत्येक सामाजिक जिवनात काम करणाऱ्याची इच्छा असते. आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. ऐवढा सर्व खटाटोप करणाऱ्या आमदारांना पगार तरी किमी मिळतो याची चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आमदारांचा पगार किती? 

प्रत्येत आमदाराला म्हणजे मग तो विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य असले. या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. यात मुळ वेतन आणि महागाई भत्ता एकत्र करून हा पगार दिला जातो. सरकारच्या प्रधान सचिवालयाकडून हा पगार देण्यात येतो. त्यानुसार एका आमदाराचे मुळ वेतन हे 1 लाख 82 हजार 200 रूपये ऐवढे आहे. तर मुळ वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता दिला जातो. म्हणजेच जवळपास 52 हजार 016 रूपये महागाई भत्ता दिला जातो. त्यानुसार 2 लाख 61 हजार 216 रूपये वेतन दिले जाते. हे वेतन दर महिन्याला दिले जाते. 

ट्रेंडिंग बातमी - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल

आमदारांना मिळणारे इतर भत्ते

आमदारांना दरमहा पगारा शिवाय अन्य भत्तेही दिले जातात. ज्यावेळी विधानसभा किंवा विधान परिषदेच्या बैठका असतात त्याला हजर राहण्यासाठी दररोजचे 2000 रूपये भत्ता दिला जातो. शिवाय जर वेगवेगळ्या समितींच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठीही भत्ता दिला जातो. या शिवाय स्विय सहाय्यक ठेवण्याचा अधिकार आमदारांना आहे. त्यासाठी सरकारकडून दर महा 25,000 हजार रूपये आमदारांना दिले जातात. त्याच बरोबर ड्रायव्हरसाठी 15,000 हजार ही आमदारांना दिले जातात. 

इतर सोयीसुविधा कोणत्या? 

या शिवाय आमदारांना इतर सोयी सुविधाही मिळतात. त्यांच्या दुरध्वनीचा खर्च हा सरकार करत असते. शिवाय राज्याअंतर्ग रेल्वे प्रवासही मोफत असतो. देशातही 30.000 किमी पर्यंतचा प्रवास ते रेल्वेने करून शकतात. त्यात कुटुंबातल्या व्यक्तींचाही समावेश असतो. या शिवाय राज्य परिवहन सेवेच्या कोणत्याही बसने आमदारांना मोफत प्रवास करता येतो. त्याच बरोबर बोटीने प्रवासही आमदारांना मोफत आहे. जे माजी आमदार आहेत त्यांनाही रेल्वे प्रवासात सुट दिली जाते. 

Advertisement

आमदारांना मिळणारी पेन्शन 

जे आमदार निवृत्त होतात त्यांना दरमहा 50 हजार रूपये निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या आमदारांची सेवा पाच वर्षा पेक्षा जास्त काळासाठी झाली आहे, त्यांना त्यांच्या प्रत्येक टर्मसाठी अतिरीक्त दोन हजार रूपये निवृत्ती वेतन दिले जाते. विधीमंडळाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यास. त्याची पत्नीला किंवा पतीला दरमहा  40 हजार रूपये कुटुंब वेतन देण्यात येते. शिवाय त्या पत्नीचा किंवा पतीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मुलांनाही पेन्शन लागू होते. 

स्थानिक विकास निधी आणि मोफत विमान प्रवास 

प्रत्येक आमदार मोफत विमान प्रवासही करता येतो. एका वर्षात राज्यांतर्गत 32 वेळा विमान प्रवास करण्याची मुभा असते. तर देशात कुठेही 8 वेळा विमानाने मोफत प्रवास करता येतो. त्याच बरोबर प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास निधी दिला जातो. प्रत्येक वर्षासाठी त्यांना स्थानिक विकास निधी म्हणून 3 कोटी रूपये दिले जातात.  
 

Advertisement

Topics mentioned in this article