जाहिरात
Story ProgressBack

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. युरोलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Time: 3 mins
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल

Lal Krishna Advani : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी (26 जून) रात्री उशीरा दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीअंतर्गत ठेवण्यात आले आहे".  

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना एम्समधील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि युरोलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या आजाराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आलेली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म आणि शालेय शिक्षण

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रांतात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव डी अडवाणी आणि आईचे नाव ज्ञानी अडवाणी होते. 25 फेब्रुवारी 1965 रोजी त्यांनी कमला यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत, त्यांच्या मुलीचे नाव प्रतिभा अडवाणी आहे. कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. फाळणीनंतर भारतात आल्यानंतर अडवाणी यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.

(नक्की वाचा: "खोट्या नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल"; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल)

अडवाणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

देशभक्तीच्या भावनेमुळे लालकृष्ण अडवाणी यांचा कल आरएसएसकडे वाढू लागला. वर्ष 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानमध्ये असल्याने स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करू शकले नाहीत. देशाच्या फाळणीनंतर ते कराचीहून दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी राजस्थानमधून त्यांनी संघाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. दीर्घकाळ त्यांनी संघ प्रचारक म्हणून कार्य केले. वर्ष 1947 पासून ते 1951 पर्यंत त्यांनी कराची शाखेचे सचिव म्हणून त्यांनी रतपूर, अलवर, बुंदी, कोटा आणि झालावाड येथे आरएसएसचे कार्यक्रमही आयोजित केले.

(नक्की वाचा- भारत जोडोनंतर आता आषाढी वारी, राहुल गांधी करणार ज्ञानोबा तुकोबाचा गजर)

लालकृष्ण अडवाणी यांचा राजकीय प्रवास

लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारर्कीदीबाबत सांगायचे झाले तर वर्ष 1951मध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. त्यावेळेस अडवाणी 1957 पर्यंत पक्षाचे सचिव होते. यानंतर 1973 ते 1977 पर्यंत त्यांनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले. वर्ष 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, तेव्हा अडवाणी संस्थापक सदस्य होते. अडवाणी यांनी 1980 पासून ते 1986 पर्यंत भाजपचे सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पाडली. 1986 ते 1991 पर्यंत ते भाजपचे अध्यक्ष होते. यानंतर ते लोकसभेचे पाच वेळा आणि राज्यसभेचे चार वेळा खासदार होते. 1977 ते 1979 या काळात ते पहिल्यांदा केंद्रामध्ये मंत्री झाले. यादरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.

अयोध्या रथयात्रेचे 'नायक'

अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणाची मागणी जोर धरत होती, त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथपासून ते अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती. यादरम्यान बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणी यांना समस्तीपूरमध्ये अटक केली होती. या घटनेनंतर लालकृष्ण अडवाणी हे राजकारणातील नायक म्हणून ओळखले जाऊ लागले.

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. सिंडिकेट फीडमधून माहिती प्रकाशित केली आहे.)

Om Birla On Indira Gandhi : इंदिरा गांधींनी लोकांवर आणीबाणी थोपवली - ओम बिर्ला 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भारत जोडोनंतर आता आषाढी वारी, राहुल गांधी करणार ज्ञानोबा तुकोबाचा गजर
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल
rahul gandhi on action will the congress party take if any one takes an anti-party stand
Next Article
'कोणी ऐकत नसेल तर भिंतीवर टांगा', पक्षविरोधी भूमिकेवर राहुल गांधी कोणाला म्हणाले?
;