धारावीतून काँग्रेसची उमेदवारी मागणाऱ्या ज्योती गायकवाड कोण? वर्षा गायकवाडांबरोबर नातं काय?

वर्षा गायकवाड या लोकसभेवर निवडून गेल्याने हा मतदार संघ रिक्त झाला आहे. या मतदार संघातून डॉ. ज्योती गायकवाड यांनी उमेदवारी मागितली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

काँग्रेसने मुंबईत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यासाठी जवळपास 200 अर्ज आतापर्यंत पक्षाकडे आले आहेत. मात्र सर्वांच्या नजरा होत्या त्या धारावी विधानसभा मतदार संघाकडे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व वर्षा गायकवाड यांनी केले आहे. मात्र वर्षा गायकवाड या लोकसभेवर निवडून गेल्याने हा मतदार संघ रिक्त झाला आहे. या मतदार संघातून डॉ. ज्योती गायकवाड यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर या ज्योती गायकवाड कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ज्योती गायकवाड या पेशाने डॉक्टर आहेत. त्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या लहान बहीण आहेत. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सायनच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वर्षा गायकवाड राजकारणात असताना पडद्या मागून सर्व सुत्र या ज्योती गायकवाडच हलवत होत्या. वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. धारावीत त्यांनी आपले काम सुरू केले. शिवाय लोकसभे वेळी वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली. लोकसभेला धारावी मतदार संघ हा दक्षिण मध्य मध्ये येत होता. इथे शिवसेनेचे अनिल देसाई रिंगणात होते. त्यांच्यासाठी धारावीतून प्रचार ज्योती यांनीच केला. 

Advertisement

ट्रिंडिंग बातमी -  'लाडक्या बहिणी'साठी वर्षा गायकवाडांनी पदर खोचला, निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नवा चेहरा

लोकसभा निवडणुकीत ज्योती यांची उपस्थिती प्रखर्षाने जाणवली. त्यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आपल्या बहीणीली उमेदवारी मिळावी यासाठी वर्षा गायकवाड यांचे प्रयत्न असणार आहे. वर्षा गायकवाड यांच्या शब्दाला दिल्लीत मान आहे. राज्याचे नेत्यां बरोबर त्यांचे चांगले संबध आहे. शिवाय त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष ही आहेत. त्यामुळे ज्योती यांनी धारावीतून उमेदवारी मिळवून देण्यात त्यांना नक्कीच यश मिळेल. त्यांची उमेदवारी सध्या तरी निश्चित मानली जात आहे. त्यामुळेच डॉ. ज्योती प्रचारालाही सुरूवात केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
  
धारावी मतदार संघ आणि गायकवाड कुटुंब यांचे भावनीक नाते आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. हा मतदार संघ माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मोठ्या मेहनतीने बांधला आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. मतदार संघावर आपण स्वत: अनेक वर्ष मेहनत केली आहे. शिवाय मी मुंबई काँग्रेसची अध्यक्ष आहे. अशा वेळी उमेदवारी देताना आपल्याला विचारले जाईल असे वर्षा गायकवाड म्हणाले. हा मतदार संघातून आपल्याच घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्योती गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 

Advertisement