Kaiynaat Dara Profile : दिवंगत अजित पवार यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांच्या लग्नाच्या जोरजार चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा नुकताच साखरपूडा झाला. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नसोहळ्यात कायनात दारा यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या डॅशिंग एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर कायनात यांच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. कायनात नेमक्या आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी कायनात दारा यांच्याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीने शेअर केलेली पोस्ट जशीच्या तशी
"अलिकडील काही वृत्तांमध्ये खा. पार्थ अजित पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव, मूळ पार्श्वभूमी आणि वैयक्तिक माहितीबाबत काही तथ्यात्मक त्रुटी आढळून आल्या. समाजामध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि अधिकृत नोंद उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आम्ही ही माहिती जाहीर करीत आहोत."
खासदार पार्थ अजित पवार यांच्या पत्नीबाबत अधिकृत माहिती
अलिकडील काही वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खासदार पार्थ अजित पवार यांच्या होणाऱ्या पत्नीबाबत काही तथ्यात्मक त्रुटींसह माहिती प्रसारित झालेली दिसून आली. विशेषतः त्यांच्या नावाचा चुकीचा उच्चार व चुकीचे स्पेलिंग तसेच त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीबाबत अचूक नसलेले उल्लेख प्रसिद्ध झाले.समाजामध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि अधिकृत नोंद उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अधिकृत नाव : Ms. Kaiynaat Dara (कायनात दारा)
अधिकृत नाव : Ms. Kaiynaat Dara (कायनात दारा)
(स्पेलिंग : Kaiynaat Dara
कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी
धर्म : Punjabi Hindu
समाज : Kshatriya
गोत्र : Kashyap
त्यांचा "काश्मिरी" असा काही माध्यमांमध्ये झालेला उल्लेख वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. शालेय शिक्षण
The British School, Chanakyapuri, New Delhi
भारताच्या राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थांपैकी ही एक संस्था मानली जाते.
नक्की वाचा << Sachin Tendulkar Tweet : देशातील विद्यार्थ्यांसाठी सचिन तेंडुलकरचं मोठं ट्वीट, "आता आपण सर्व मिळून.."
उच्च शिक्षण
- The London School of Economics and Political Science (LSE), London
- Bachelor of Science (B.Sc.)
- International Relations
- First Class Honours
- LSE ही सामाजिक शास्त्रे, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांतील जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानली जाते.
- व्यावसायिक अनुभव
- उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या
- NDTV २४x७ मध्ये
- Output Editor
- Reporter म्हणून कार्य केले.
सध्याचे कार्य
सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. सार्वजनिक जीवनातील भूमिका..खासदार पार्थ अजित पवार यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सून म्हणून त्या सार्वजनिक जीवनात प्रवेश करत आहेत.शिक्षण, जागतिक दृष्टीकोन, व्यावसायिक अनुभव, सार्वजनिक व्यवहारांची जाण आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा आदर या सर्वांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सार्वजनिक जीवन, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सकारात्मक योगदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.