धीरज देशमुखाना आव्हान देणार, मनसेची उमेदवारी जाहीर झालेले संतोष नागरगोजे कोण?

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी या गावातील शेतकरी कुटुंबात संतोष नागरगोजे यांचा जन्म झाला. त्यामुळे सुरूवाती पासूनच ते शेतकरी प्रश्नाबाबत सजग होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
लातूर:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच मराठवाड्याचा आढावा घेतला. लातूर मुक्कामी असताना त्यांनी लातूर ग्रामिण विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. मनसे किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे हे मनसेच लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या मतदार संघात ते काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देखमुख यांना आव्हान देतील. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत संतोष नागरगोजे? 

संतोष नागरगोजे हे सध्या मनसेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर मनसेच्या किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली राजकीय वाटचाला भारतीय विद्यार्थी सेनेपासून केली. राज ठाकरेहे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळी संतोष नागरगोजे हे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष होते. पुढे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली. त्यावेळी नागरगोजे हे राज ठाकरे यांच्या बरोबरच राहीले. त्यांना लातूर जिल्हाध्यक्ष करण्यात आले. पुढे त्यांना पक्षाचे सरचिटणिसही करण्यात आले. शिवाय त्यांच्यावर मनसे किसान सेनेची जबाबदारी देण्यात आली. मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्येही त्यांचा समावेश होता. त्यात त्यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना

दोन वेळा विधानसभा लढली  

संतोष नागरगोजे यांना दोन विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. त्यांनी 2009,2014 ची विधानसभा निवडणूक लढली आहे. ही निवडणूक ते लातूर ग्रामिण याच मतदार संघातून लढले आहेत. पण त्यांना दोन्ही वेळा पराभव स्विकारावा लागला होता. काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे,आणि रमेश आप्पा कराड यांच्या विरोधामध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना 2006 मध्ये मिळाला होता. सध्या विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या ताब्यात आहेत. या शिवाय पानगाव जिल्हा परिषद गटामध्ये सात ते आठ ग्रामपंचायती मनसेच्या ताब्यात आहेत.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?

जिल्ह्यातील आंदोलनात मोठा सहभाग 

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी या गावातील शेतकरी कुटुंबात संतोष नागरगोजे यांचा जन्म झाला. त्यामुळे सुरूवाती पासूनच ते शेतकरी प्रश्नाबाबत सजग होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा सरकार आणि प्रशासन विरोधात आंदोलन करून धारेवर धरले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संतोष नागरगोजे यांनी जिल्हाभरामध्ये वेगवेगळी आंदोलन केली आहेत. शेतकऱ्यांसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला होता. पिक विमा,ऊस प्रश्न, यावरती त्यांनी वारंवार सरकारला धारेवर धरलं आहे. कृषी सहसंचालकाच्या ऑफिसची ही त्यांनी तोडफोड केली होती. वरळीतील मुख्य पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये राडा केला होता. शिवाय पणेश्वर साखर कारखाना, मांजरा साखर कारखाना इथं शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून वेळोवेळी आंदोलन केली होती. ते जनता दरबारही भरवत असतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?

धीरज देशमुखांना आव्हान देणार 

लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. या मतदार संघाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला होता. यावेळी त्यांना मनसेचे संतोष नागरगोजे हे आव्हान देणार आहेत. आपण सर्व सामान्य कुटुंबातील आहोत. जनतेसाठी नेहमीच रस्त्यावर असतो. जनतेचा आवाज आपण उचलतो. आपले मतदार संघात काम आणि संपर्क आहे. या गोष्टींना जनतेने महत्व दिले तर आपला विजय नक्की आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जनतेने ठरवले तर घराणेशाहीला या निवडणुकीत ब्रेक लागेल असेही ते म्हणाले. धीरज देशमुख यांच्या काळात मतदार संघात काहीच विकास झाला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.