जाहिरात

Who is VD Satheesan: कोण आहेत केरळमचे नवे मुख्यमंत्री VD सतीशन? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या 10 खास गोष्टी

वैचारिक पातळीवर सतीशन हे कट्टर धर्मनिरपेक्ष मानले जातात.

Who is VD Satheesan: कोण आहेत केरळमचे नवे मुख्यमंत्री VD सतीशन? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या 10 खास गोष्टी
  • वीडी सतीशन यांना केरळमचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे
  • सतीशन हे एक अभ्यासू नेता असून त्यांनी काँग्रेसच्या एनएसयूआय संघटनेत राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे
  • त्यांनी सलग चार निवडणुकांत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून जनतेमध्ये आपली मजबूत पकड प्रस्थापित केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

केरळच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे वीडी सतीशन. काँग्रेस नेतृत्वाने VD सतीशन यांच्या नावावर केरळमचे  मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. ते आता केरळमचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील. एक अभ्यासू नेता आणि प्रखर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थी नेता ते थेट मुख्यमंत्री असा सतीशन यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने केरळममध्ये निवडणूक लढवली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मोठे समर्थन त्यांना होते. शिवाय तिथल्या जनतेमध्ये ही त्यांना पसंती होती. ऐवढचं काय तर काँग्रेसच्या मित्र पक्षाने ही सतीशन यांच्याच नावाला पसंती दिली होती. 

  1. सतीशन हे विद्यार्थी नेते म्हणून राजकीय प्रवासाला सुरूवात केली. ते अत्यंत अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कायद्याची समज आणि राजकीय चातुर्य आहे. ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. डाव्यां विरोधात केरळमध्ये त्यांना रान उठवले होते.  
  2. विद्यार्थी दशेतून सतिशन यांनी राजकारणात प्रवेश केला. वीडी सतीशन यांचा जन्म एर्नाकुलम जिल्ह्यातील नेट्टूर येथे झाला. कॉलेज जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय होते. महात्मा गांधी विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
  3. सतीशन यांनी एनएसयूआय (NSUI) या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत राष्ट्रीय पातळीवर काम केले. ज्यामुळे त्यांचा काँग्रेस संघटनेत चांगला दबदबा निर्माण झाला.
  4. सतीशन हे केवळ राजकारणी नसून ते उच्च न्यायालयाचे वकील देखील आहेत. त्यांना अर्थशास्त्राची उत्तम जाण असून विधानसभेत ते अत्यंत अभ्यासू भाषणे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 
  5. सतीशन यांना वाचनाची प्रचंड ओढ असून ते दररोज किमान 50 पाने वाचतात. विशेष म्हणजे, त्यांना वन्यजीवांबाबत ओढ आहे. पश्चिम घाटातील सर्व शिखरांवर त्यांनी चढाई केली आहे. 
  6. सतीशन यांनी 90 च्या दशकात परवूर मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 
  7. पुढे सतीशन हे 2006, 2011, 2016 आणि 2021 अशा सलग निवडणुकांमध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. 2021 च्या निवडणुकीत त्यांनी 21,301 मतांच्या फरकाने विजय मिळवून आपली जनमानसातील पकड सिद्ध केली.
  8. वैचारिक पातळीवर सतीशन हे कट्टर धर्मनिरपेक्ष मानले जातात. नायर समाजातून येत असूनही त्यांनी कधीही जातीच्या राजकारणाचा आधार घेतला नाही. ते माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचे कट्टर समर्थक समजले जातात.   
  9. त्यांनी काँग्रेसमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. राज्याच्या राजकारणावर त्यांनी चांगलीच पकड आहे.  
  10. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करूनच त्यावर भाष्य करण्याची त्यांची शैली त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ठरवते. त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांच्या मनात सतीशन होते. त्यामुळे केसी वेणूगोपाळ यांचे नाव मागे पडले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com