सुनेत्रा पवार का हरल्या? त्यांना हरवणारे 'दादा'कोण? कार्यकर्त्याच्या पत्राने खळबळ

किरण लकडे हा अजित पवार यांचा कार्यकर्त्या आहे. तो खंडोबाचीवाडी इथं राहतो. त्याने अजित पवारांना एक खुलं पत्रं लिहीलं आहे. त्यात त्याने सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? त्याला जबाबदार कोण? याचीच मांडणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

देवा राखुंडे

बारामती लोकसभेच्या निकालानंतर पराभव का झाला याचे चिंतन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट करत आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येत आहे. भावनेच्या आधारावर सुप्रिया सुळे जिंकल्या असाही अर्थ अजित पवार गट काढत आहे. पण आता त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी त्यांना सविस्तर पत्र लिहून पराभव का झाला? याची मिमांसा केली आहे. त्यात त्यांनी काही धक्कादायक गोष्टीही सांगितल्या आहेत. शिवाय आगामी विधानसभेच्या दृष्टीने सावधही केले आहे. या कार्यकर्त्याच्या पत्राने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कार्यकर्त्याचे पत्रात खळबळजनक खुलासे 

किरण लकडे हा अजित पवार यांचा कार्यकर्त्या आहे. तो खंडोबाचीवाडी  इथं राहतो. त्याने अजित पवारांना एक खुलं पत्रं लिहीलं आहे. त्यात त्याने सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? त्याला जबाबदार कोण? याचीच मांडणी केली आहे. अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पराभव सहानुभूतीमुळे झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय ते अजित पवारांना पटवून ही दिलं आहे. पण सहानुभूतीमुळे हा पराभव झालेला नाही असे एका कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. हा पराभव राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमुळे झाल्याचा दावा लकडे या कार्यकर्त्याने केला आहे. हे पदाधिकारी लोकांची कामे करत नाहीत. ते लोकांना दमदाटी करतात. त्यांची गावा सोबतची नाळ तुटली आहे. ते तुमच्या मागे पुढे राहण्यात धन्य मानतात. तुमच्या मागे तेच स्वयम घोषित दादा झाले आहेत. त्यांना तुम्ही पदं दिली. पण त्यांनी त्याचा वापर लोकांसाठी करण्या ऐवजी स्वतासाठी आणि कुटुंबांची घरं भरण्यासाठी केला आहे असा आरोपही त्याने या पत्रात केला आहे. त्यांच्या या वागण्यामुळेच सर्वसामान्य नागरिक हा दुखावला गेला होता. त्याचा या पदाधिकाऱ्यांवर राग होता. तोच राग मतदानातून दिसून आला. वेळीच या स्वयंमघोषित दादाना आवर घाला. शिवाय विधानसभेला सामोरे जात असताना या पदाधिकाऱ्यांना लांब ठेवा असेही तो या पत्रातून सांगतो. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सुजाता सौनिक इतिहास रचणार? महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता

बारामतीचा पराभव जिव्हारी  

बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या अगदीच जिव्हारी लागलाय. बारामती विधानसभा मतदार संघात सुनेत्रा पवार 45 हजार मताच्या पिछाडीवर राहिल्या.पण हा पराभव  सहानभुतीच्या लाटेमुळे झाल्याचं, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पटवून दिलय.मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मात्र वेगळी भूमिका आहे. हा पराभव आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे झाल्याचा आरोप खंडोबाचीवाडी येथील किरण लकडे या कार्यकर्त्याने केलाय. त्यांनी केलेल्या आरोपाचे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

अजितदादा आता काय करणार? 

बारामतीत झालेला पराभव हा सुनेत्रा पवारांचा असला तरी तो अजित पवारांचा पराभव समजला जात आहे. या पराभवाचा फटका अजित पवारांना भविष्यातही बसत आहे. आपल्या होमपिचवरच फटका बसल्याने तो अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. शिवाय ज्या बारामती विधानसभेचे अजित पवार प्रतिनिधीत्व करतात त्या मतदार संघातही सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले नाही. ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जाते. त्यात शरद पवारांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते बारामतीतल्या गावा गावात फिरत आहेत. अशी वेळी एका कार्यकर्त्याने लिहीले पत्र अजित पवार किती गांभिर्याने घेतात हे रहावं लागणार आहे. 

Advertisement