Asaduddin Owaisi statement : महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांकडून जाहीरनामा सादर करण्यात आला, तर अनेकांकडून चर्चेत राहणारी वक्तव्य केली जात आहेत.
'एक दिवस हिजाब घालणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल'
महापालिका निवडणुकीसाठी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन औवेसी रान पेटवताना दिसत आहेत. सोलापुरातल्या सभेत असदुद्दीन औवेसींनी एक भाकीत केलं. औवेसी म्हणाले, एक दिवस या देशात असा येईल की हिजाब घालणारी महिला पंतप्रधान होईल. औवेसी शुक्रवारी सोलापुरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या संविधानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. ते पाहायला कदाचित मी जीवंत नसेल. पण एकदिवस असा येईल जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल.
औवेसींनी हे वक्तव्य करताच भाजपचे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे आणि अनिल बोंडे दोघेही कडालेत. काँग्रेसचा मात्र औवेसींना पाठिंबा आहे. काँग्रेसचे नेते म्हणतायत... कुणीही पंतप्रधान होऊ शकेल. विजय वडेट्टीवार म्हणाले, जो कोणी संविधान मानतो, तो कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. लोकशाहीत जनता निवडून देईल ते पंतप्रधान होतील. ओवेसी मुस्लीम बोलतात भाजप हिंदू बोलतात हे दोघेही ध्रुवीकरण करत आहेत. महापालिका निवडणुकीत औवेसींची व्होटबँक अर्थातच मुस्लीम आहे. तर भाजप आणि शिवसेनेची व्होटबँक हिंदू आहे. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण करुन जास्तीत जास्त मतं पाडून घ्यायची ही सगळ्याच पक्षांची खेळी आहे.