जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, मोठं कारण आलं समोर

स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी हा हल्ला आम्हीच केला असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हल्लाची जबाबदारी स्वराज संघटनेने घेतली आहे. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी हा हल्ला आम्हीच केला असल्याचे सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी जे वक्तव्य केले होते त्याच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला. शिवाय यापुढच्या काळात आव्हाड यांनी जपून बोलावे असा इशाराही दिला आहे. दरम्यान अशा हल्ल्यांना आपण घाबरत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. शिवाय याची कोणतीही तक्रार आपण करणार नाही असेही ते म्हणाले. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

जितेंद्र आव्हाड हे आज पक्ष कार्यालयात होते. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद ही घेतली. यात त्यांनी विशाळ गडावर झालेल्या प्रकाराबद्दल आपली प्रतिक्रीया दिली. विशाळ गडावर जे झाले ते संभाजीराजे छत्रपतींच्या आडून झाले. त्यांची ही भूमिका योग्य नव्हती. त्यांनी शाहू महाराजांचा वारसा जपला पाहीजे. जर त्यांनी तो जपला नाही तर त्याला आम्ही विरोध करू. संभाजीराजे छत्रपती हे शाहू महाराजांचे  रक्ताचे वंशज आहेत.पण मी विचारांचा वंशज आहे. असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. विशाळगडावर जे झाले तो पुर्वनियोजित कट होता असा आरोप त्यांनी केला. एका संभाजीच्या आडून दुसऱ्या संभाजीने विशाळगडावर तांडव केले असा आरोपही त्यांनी केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

स्वराज संघटनेला आव्हाडांची ही भूमिका पटली नाही. या आधीही आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपती यांना लक्ष्य केले होते. यामुळे संतप्त झालेल्या स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड पत्रकार परिषद संपवून ठाण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांची वाट पाहत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकले. काहींना काठीने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यात आव्हाडांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पोलिसांनी खाली उतरून कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आव्हाडांची गाडी पुढे निघून गेली. या घटनेनंतर या हल्ल्याची जबाबदारी स्वराज संघटनेनं घेतली आहे. संघटनेचे सरचिटणिस धनंजय जाधव यांनी हा हल्ला आपणच केला असल्याचे सांगितले आहे. शिवाय संभाजीराजे छत्रपतींवर बोलणे आव्हाडांनी टाळावे असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'

हल्ल्यानंतर आव्हाडांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. अशा हल्ल्याला आपण घाबरत नाही. शिवाय हल्ला विरोधात आपली कोणतीही तक्रार नाही. तक्रार करणार ही नाही. पण संभाजीराजेंनी शाहूंचा वारसा हा जपलाच पाहीजे. त्यांनी तो जपला नाही तर आपण त्यांना विरोध करू असेही ते म्हणाले. मुस्लिमांना शिव्या देवून आपण हिंदू आहोत हे सिद्ध करता येणार नाही असेही ते म्हणाले. विशाळगडावर घडलेली घटना ही खासदार छत्रपती शाहू महाराज यांना देखील पटलेली नाही, असेही ते म्हणाले.  

Advertisement