
कुणाल कामरा याचा शो ज्या हॅबिटॅटमध्ये झाला, त्याची तोडफोड झाली होती. शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते राहुल कनाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती. याच राहुल कनाल यांनी आता कुणाल कामरा याला इशार दिला आहे. दम असेल तर समोरा समोर येवून चर्चा कर. तू सांगशील ती जागा, तू सांगशील तो दिवस आमची तयारी आहे असं ही त्यांनी सांगितलं. शिवाय या पुढे मुंबईच काय महाराष्ट्रात कुणाल कामराचा शो होवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हॅबिटॅटच्या मालकाला मी फोन केला होता. पण त्यांनी आपल्याला त्याबाबत काहीच माहित नाही असं सांगितलं होतं. त्यांचे बोलणे हे उर्मट पणाचे होते. त्यामुळे शिवसैनिकांनी तोडफोड केली असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे लोक नेते आहेत. त्यांच्याबाबत तुमच्या जागेत चुकीचं बोललं जातं आणि तुम्हाला माहित नाही ही बाब गंभीर आहे असं ही त्यांना सांगितलं. तरी ही ते काही ऐकायला तयार नव्हते असंही ते म्हणाले. त्यामुळे पुढचा सर्व प्रकार घडला असं त्यांनी स्पष्ट केलं.
कुणाल कामराचे या पुढे मुंबईत शो होवू देणार नाही. महाराष्ट्रात ही त्याचे शो आता होणार नाही. जे कुणी त्याच्या शो चे आयोजन करतील त्यांना आधी आम्ही निट सांगू. तुम्ही त्याचा शो आयोजित करू नका. जर का त्यांनी ऐकले नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांनाही अशा प्रकारांचा सामना करावा लागेल असा इशाराही कनाल यांनी यावेळी दिला. त्यांनी कुणाल कामाराला ही खुले आव्हान दिले आहे. लपून बोलू नको, तुझ्यात हिंमत असेल तर समोरा-समोर येऊन चर्चा कर, असं ही ते म्हणाले.
कुणाल कामरासारखी लोकं कुठल्यातरी नशेच्या प्रभावाखाली, रात्री असं बोलतात आणि सकाळी विसरून जातात. कुणाल कामरा हा चावीच्या खेळण्या सारखा आहे. त्याला जितकी चावी द्याल तितका तो नाचतो अशी टिका ही त्यांनी केला.शिवाय संजय राऊत आज पहिल्यांदा खरे बोलले. कुणाल कामरा आणि संजय राऊत यांचा डीएनए एकच आहे. कुणाल कामरा उमर खालीदचं समर्थन करतो. संजय राऊत औरंगजेबाचा समर्थन करतात. त्यामुळे त्यांचा डीएनए एकच असल्याची टिका त्यांनी केली.
कामराने कंगाल होणार असं एक गाणं तयार केलं आहे. त्यात त्याने शिंदे गटावर टीका केली आहे. त्यावर बोलताना तुझ्यासारख्या लोकांच्या गाण्याने आमचं काहीही होणार नाही, असं ही कनाल म्हणाले. कोविडमध्ये घाबरून कुणाला फोन करत होता, जरा आठवं, स्वतःचे कॉल रेकॉर्ड चेक कर असं ही कनाल म्हणाले. शिवाय आम्ही ठरवलं तर 24 तासात कुणाल कामराला आमच्या ताब्यात घेवू. कुणाल कामराला आताही सांगतो तुझी नशा उतरली असेल तर अजूनही वेळ गेली नाही.असं सांगत कामरा बरोबर संघर्ष हा होणार याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world