हार्दिक पांड्या त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट काळातून जात आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक आव्हानांचा तो सामना करत आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे फॅन्स हार्दिकला प्रचंड ट्रोल करत आहे. तर त्याचा सध्याचा फॉर्मदेखील खराब आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि मिस्टर 360 नावाने ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्सने देखील हार्दिकवर निशाणा साधला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एबी डिविलियर्सने म्हटलं की, "हार्दिक कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना त्यात अहंकार दिसतो. मैदानात शांत दिसण्याचा त्याचा स्वभाव खरा वाटत नाही. मुंबई इंडियन्स संघात अनेक खेळाडूंना हार्दिकचं साहसी वाटणारं नेतृत्व पटत नाहीये. मात्र तरीदेखील हार्दिकने ठरवलं आहे की माझ्या नेतृत्वाची हीच पद्धत असणार आहे."
(नक्की वाचा- 'तो कॅप्टन आहे, कुणी... KL राहुलच्या बचावासाठी पुढं आला शमी, लखनौच्या मालकांना सुनावलं)
"हार्दिक स्वत:ला धोनीसारखा कप्टन कूल दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रत्यक्षात तो तसा नाही. ज्यावेळी तुम्ही गुजरातसारख्या युवा खेळाडूंनी भरलेल्या टीमचं नेतृत्व करता, त्यावेळी ही शैली काम करते. मात्र जेव्हा तुम्ही रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या अनेक अनुभवी खेळाडूंसोबत खेळता तेव्हा ही पद्धत काम करणार नाही", असं एबी डिविलियर्सने म्हटलं.
(नक्की वाचा : आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका? )
दीर्घ काळ कर्णधार राहिलेल्या रोहित शर्माला हटवून हार्दिकला मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिक देखील मुंबई इंडियन्ससाठी अनेक वर्ष खेळला आहे. मात्र गुजरात टायटन्सने 2022 साली हार्दिकला लिलावात खरेदी करत कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. त्याचवर्षी गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यानंतर 2023 साली गुजरातचा संघ उपविजेता ठरला.
हार्दिकची हीच कामगिरी पाहता त्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. मात्र रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना हा बदल आवडला नाहीच. हार्दिकला अनेकजा रोहितच्या फॅन्सच्या रोषाला सामोरं जावं लागले. मैदानात देखील त्यांना हुडिंगचा सामना करावा लागला. मात्र हार्दिकच्या अडचणी अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.