Imane Khelif Medical Report: पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफवरुन मोठा वाद झाला होता. तिच्यावर पुरुष असूनही महिलांच्या गटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. पॅरिस ऑलिम्पिक समितीनं हे आक्षेप फेटाळत तिला महिलांच्या गटात खेळण्यास परवानगी दिली. अल्जेरियन बॉक्सरनं तिच्या गटात गोल्ड मेडल जिंकलं. पण, आता एका रिपोर्टमध्ये ती महिला नाही तर पुरुष आहे असा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे.
इमान खलिफचा मेडिकल रिपोर्ट काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार खलीफमध्ये आंतरिक अंडकोष ((Internal Testicles) आणि XY गुणसूत्र (पुरुष गुणसूत्र) आहेत. ते फाईव्ह अल्फा रिडक्टेज या अपुरेपणाचा विकार असल्याचं लक्षण आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही खलिफाच्या विरुद्ध खेळलेल्या महिला बॉक्सरनं ती पुरुष असल्याचे संकेत दिले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे हॉस्पिटल आणि अल्जियर्समधील मोहम्मद लमाइन डेबघाइन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी जून २०२३ मध्ये हा अहवाल तयार केल्याची माहिती आहे. हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल होताच खलिफाचं गोल्ड मेडल परत घ्यावं अशी मागणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं केलीय. त्यानं ऑलिम्पिक समितीला टॅग करत याबाबतचं ट्विट केलं आहे.
इमान खलीफच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी 2023 मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन तिच्यावर बंदी घातली होती. दिल्ली बॉक्सिंग असोसिएशननं इमानला वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड मेडलमध्ये भाग घेण्यास बंदी घातली होती.
( नक्की वाचा : 16 मुलं.. वाह! पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कुटुंबाची कॉमेंट्रीदरम्यान थट्टा, वासिम अक्रमही सहभागी )
इमान खलिफनं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'मी अन्य कोणत्याही महिलेसारखी महिला आहे. स्त्री म्हणून जन्माला आले. स्त्री सारखे राहते आणि त्यांच्या गटातून पात्र होते,' असं तिनं सांगितलं होतं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह अनेकांनी खलिफाच्या लैंगिकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्या लोकांनी निर्माण केलेल्या वादाचा आपल्यावर परिणाम झाल्याचं खलिफानं सांगितलं होतं.