FIFA World Cup: शेवटच्या क्षणी बाजी पलटली! अर्जेंटीनाचे सेमीफाइनलचे तिकीट फिक्स, मेस्सीचं ही रेकॉर्ड

अर्जेंटीनाने या सामन्यात तिन गोल केले. विशेष म्हणजे यात लिओनेल मेस्सीला एक ही गोल करता आला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Argentina vs Switzerland: फिफा विश्वचषक 2026 च्या सेमीफाइनलच्या लढती आता फिक्स झाल्या आहेत. फ्रान्स विरुद्ध स्पेन आणि अर्जेंटीना विरुद्ध इंग्लड हे चार संघ आता वर्ल्डकप जिंकण्यासाठी एकमेकां विरोधात लढतली. त्या आधी उपांत्यपूर्व फेरीतील शेवटची लढत अर्जेंटीना विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यात झाली. अपेक्षे प्रमाणे हा सामना अटीतटीचा झाला. पण शेवटच्या क्षणी अर्जेंटीनाने जोरदार मुसंडी मारत स्वित्झर्लंडचा 3-1 असा पराभव केला. शिवाय दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही 6 वी वेळ आहे. या सामन्यात मेसीने ही एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे.  

निर्धारित 90 मिनिटांपर्यंत 1-1 अशा बरोबरीत हा सामना पोहोचला. त्यामुळे एक्स्ट्रा टाईम देण्यात आला होता. यावेळी अर्जेंटीनाने आपला खेळ उंचावत दोन गोल केले आणि विजय आपल्या नावार केला.  ​सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने आक्रमक सुरुवात केली होती. सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच लिओनेल मेस्सीने घेतलेल्या कॉर्नर किकवर ॲलेक्सिस मॅकॲलिस्टरने उत्कृष्ट हेडर करत गोल केला. अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळाली होती.  मात्र, दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंडने जोरदार पुनरागमन केले. 67 व्या मिनिटाला रिकार्डो रॉड्रिग्जच्या पासवर डॅन एनडोयेने गोल केला. सामना बरोबरीत झाला. 

Advertisement

नक्की वाचा - FIFA World Cup 2026: 'गोल्डन बूट' कोण जिंकणार? रेसमध्ये कोणकोण? पाहा सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंची लिस्ट

​70 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू ब्रील एम्बोलो याला व्हीएआर (VAR) रिव्ह्यू नंतर रेड कार्ड मिळाले. त्यामुळे त्याला मैदाना बाहेर जावं लागलं. स्वित्झर्लंडला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. फिफाच्या इतिहासात अर्जेंटिनाचा हा 13 वा एक्स्ट्रा टाईम होता. तो पण एक विक्रम आहे. अर्जेंनटीनाने सामन्याच्या 112 व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने केलेला गोल गेमचेंजर ठरला. या गोलमुळे अर्जेंटिनाला 2-1 अशी आघाडी मिळाली. त्यानंतर पाठोपाठ लाऊतारो मार्टिनेझने तिसरा गोल करत स्वित्झर्लंड स्पर्धेतूनच बाहेर कले. 

नक्की वाचा - FIFA World Cup 2026: मेसीवर 'महा'मेहरबानी? इजिप्तसोबत बेईमानी! सामन्यादरम्यान जे घडलं त्याने खळबळ

​अर्जेंटीनाने या सामन्यात तिन गोल केले. विशेष म्हणजे यात लिओनेल मेस्सीला एक ही गोल करता आला नाही.  असं असलं तरी एक असिस्ट म्हणजेच गोलसाठी मदत करत त्याने इतिहास रचला. फिफा विश्वचषक इतिहासात 10 असिस्ट देणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या विश्वचषकात मेस्सीच्या नावावर आता 8 गोल आणि 2 असिस्ट झाले आहेत. गोल्डन बूटच्या शर्यतीत तो फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेसोबत (8 गोल, 3 असिस्ट) बरोबरीत आहे.