जाहिरात

FIFA World Cup 2026: मेसीवर 'महा'मेहरबानी? इजिप्तसोबत बेईमानी! सामन्यादरम्यान जे घडलं त्याने खळबळ

​सामन्याच्या अंतिम टप्प्यात अर्जेंटिनााच्या पेनल्टी बॉक्समध्ये इजिप्तच्या खेळाडूची जर्सी ओढण्यात आली होती.

FIFA World Cup 2026: मेसीवर 'महा'मेहरबानी? इजिप्तसोबत बेईमानी! सामन्यादरम्यान जे घडलं त्याने खळबळ
  • अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील विश्वचषक २०२६ च्या राउंड ऑफ १६ सामन्यात अर्जेंटिनाने शेवटच्या क्षणी जिंकला
  • इजिप्तने सुरुवातीपासून आघाडी राखली असली तरी VAR आणि रेफरीच्या निर्णयांवरून वाद निर्माण झाला
  • इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी रेफरीवर पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत

अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील 'राउंड ऑफ 16' चा सामना जेवढा अटीतटीचा झाला तेवढाच तो वादात ही सापडला आहे. इजिप्त संघाने फिफा विश्वचषक 2026 या स्पर्धेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या सामन्यात इजिप्तने सुरूवाती पासून पकड बनवली होती. अर्जेंटिना सामना हरणार अशी स्थिती होती. जवळपास 78 व्या मिनिटापर्यंत इजिप्तने आपली आघाडी 2-0 ने कायम ठेवली होती. मात्र, शेवटच्या 13 मिनिटांत अर्जेंटिनाने जोरदार मुसंडी मारली. नुसती मुसंडी मारली नाही तर 3-2 अशा फरकाने हा जिंकना खिशात घातला. या सामन्यामुळे अर्जेंटीना उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. 

मात्र असं असलं तरी अर्जेंटिनाचा हा विजय वादात सापडला आहे. सर्वत्र मेसी आणि कंपनीचे कौतूक होत असताना या विजयात गालबोट लागल्याची बाब ही आता समोर येत आहे. या सामन्या  रेफरी आणि VAR (Video Assistant Referee) च्या पक्षपाती निर्णयांवरून वाद पेटला आहे. फुटबॉल जगतात हा नवा वाद आणखी  पेटण्याची शक्यता आहे. इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी रेफरींवर गंभीर आरोप केले आहे. ऐवढेच काय तर  यापुढे आपण फुटबॉल वर्ल्ड कप पाहणार नसल्याचे संतापाने म्हटले आहे. सरळसरळ अर्जेंटिनाला जिंकवण्यासाठी रेफरी काम करत होते असा आरोप त्यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Neymar Retires: फुटबॉल जगतातून मोठी बातमी! ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास

​सामन्यात इजिप्त 1-0 ने पुढे होता. त्यात इजिप्तने 58 व्या मिनिटाला मुस्तफा झिकोने जबरदस्त गोल करत टीमला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु, रेफरी फ्रँकोइस लेटेक्सियर यांनी VAR च्या सांगण्यावरून पिचसाइड मॉनिटरवर फुटेज पाहिले. त्यानंतर हा गोल रद्द करण्यात आला. हा इजिप्तसाठी मोठा झटका होता. गोलच्या 10 सेकंद आधी आणि तब्बल 100 यार्ड दूर इजिप्तच्या मारवान अटियाने अर्जेंटिनााच्या लिसांद्रो मार्टिनेझला ओढले होते. असा आक्षेप VAR ने घेतला. इतक्या दूर आणि आधी झालेल्या सामान्य घटनेसाठी थेट गोल रद्द करण्याच्या या निर्णयावर अनेक दिग्गजोंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हाच या सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. 

नक्की वाचा - FIFA World Cup 2026: नॉर्वेच्या टीमचे Viking Row celebration संपूर्ण जगभर viral, जाणून घ्या काय आहे अर्थ?

​सामन्याच्या अंतिम टप्प्यात अर्जेंटिनााच्या पेनल्टी बॉक्समध्ये इजिप्तच्या खेळाडूची जर्सी ओढण्यात आली होती. तसेच मोहम्मद सलाहच्या पायावर अल्वारेझने पाय मारून त्याला पाडले होते. इजिप्तने पेनल्टीची जोरदार मागणी यावेळी केली होती. पण रेफरी आणि VAR दोघांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गोल रद्द करण्यासाठी 100 यार्ड मागे जाणारे रेफरी, पेनल्टीच्या वेळी मात्र गप्प का बसले? असा सवाल माजी इंग्लंड स्टार इयान राइट याच्यासह अनेक समालोचकांनी उपस्थित केला आहे. फिफा कोणाची तरी पाठराखण करत असल्याचा आता आरोप होत आहे.याचा  थेट पुरावा नसला, तरी एकाच सामन्यात दोन वेगवेगळ्या संघांसाठी लावलेले वेगवेगळे निकष संशयाला जागा देणारे आहेत अशीच चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे अर्जेंटिनाच्या या विजयाला गालबोट लागले आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com