Asia Cup 2025, Pakistan Vs UAE LIVE Updates: आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सावरलेलं नाही. या मॅचनंतर बिथरलेलं पाकिस्तान आशिया कपचं मैदान सोडल्याचं वृत्त आलं होतं. पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात आज (बुधवार, 17 सप्टेंबर ) होणार आहे. हा सामना रद्द झाला, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्यानुसार करण्यात येत होता. पण, पाकिस्ताननं पुन्हा घुमजाव केल्याचं वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान विरुद्ध यूएई सामना हा एक तास उशीरा सुरु होईल.
काय आहे वाद?
पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली होती. पण, आयसीसीनं ती मागणी फेटाळली. त्यानंतर नाराज झालेलं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यूएईविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचा दावा पाकिस्तानच्या मीडियानं केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंचे किट बॅग बसमध्ये ठेवले आहेत, परंतु बस हॉटेलमधून स्टेडियमसाठी नियोजित वेळेत निघाली नव्हती. पाकिस्तानी पत्रकारांच्या मते, खेळाडूंना त्यांचे किट बॅग बसमध्ये असेपर्यंत स्टेडियममध्ये न जाण्यास सांगण्यात आले होते. पण, नंतर अखेर पाकिस्तानची टीम हॉटेलमधून बाहेर पडली.
आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील चर्चेनंतर पीसीबीनं माघार घेतली असून पाकिस्तानला खेळण्याचे आदेश दिले आहेत.
( नक्की वाचा : IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, शाहिद आफ्रिदीने जावई शाहीनला सर्व जगासमोर झापले ! पाहा Video )
‘क्रिकबझ'च्या अहवालानुसार, अमीरात क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री झालेल्या बैठकीत एक तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार, पायक्रॉफ्ट स्पर्धेत कायम राहतील, परंतु त्यांना पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्याच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. त्यांच्या जागी आयसीसीचे दुसरे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांना ही जबाबदारी दिली जाईल. पण, त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यू टर्न घेतला. आता पाकिस्ताननं माघार घेतल्याचा थेट फायदा यजमान यूएईला झाला आहे. यूएईची टीम या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पोहचली आहे.
या सर्व घडामोडींवर अंतिम निर्णय घेण्यासाठी लवकरच लाहोरमध्ये मोहसिन नक्वी पत्रकार परिषद घेतील, अशी अपेक्षा आहे