भारतानं इतिहास घडवला, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचं पटकावलं विक्रमी विजेतेपद

Advertisement
Read Time: 1 min
C
मुंबई:

Asian Champions Trophy 2024 India vs China Final: पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ मेडल विजेती भारतीय हॉकी टीम आशियाई चॅम्पियन बनली आहे. जुगराज सिंहनं चौथ्या क्वार्टरमध्ये केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर भारतानं फायनलमध्ये चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतानं या स्पर्धेचं विजेतेपद पाचव्यांदा जिंकत इतिहास घडवला आहे. 


भारतीय हॉकी टीम या स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ करणाऱ्या भारताला फायनलमध्ये विजय सहज मिळाला नाही. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चीननं चिवट खेळ केला. भारताला या कालावधीमध्ये चीनचा बचाव भेदता आला नाही. अखेर, जुगराज सिंहनं 51 व्या मिनिटाला फिल्ड गोल करत भारताला विजतेपद मिळवून दिलं. यापूर्वी पाकिस्ताननं दक्षिण कोरियाचा 5-2 असा पराभव करत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. 
 

Topics mentioned in this article