अनलकी क्रिकेटर : 13 वेळा एकाच घटनेची शिकार झालेल्या क्रिकेटपटूची 26 व्या वर्षीच निवृत्ती

Will Pucovaki retire from professional cricket : ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमधून एक मोठी बातमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटला अलविदा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Will Pucovaki
मुंबई:

Will Pucovaki retire from professional cricket : ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमधून एक मोठी बातमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानं फक्त 26 व्या वर्षीच हा निर्णय घेतलाय. विल पुकोवस्की असं या तरुण ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं नाव आहे. त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केलं होतं. पण, सतत घडणाऱ्या दुर्दैवी प्रकारामुळे त्याची कारकिर्द अकाली संपली आहे. 

पुकोवस्कीनं 36 फर्स्ट क्लासस मॅचमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीनं 2350 रन केले आहेत. भारताविरुद्ध 2020 साली झालेल्या सिडनी टेस्टमध्ये त्यानं पदार्पण केलं होतं. या मॅचमध्ये त्यानं 62 रन केले होते. नवदीप सैनीनं त्याला आऊट केलं होतं. सिडनी टेस्टमध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो 6 महिने क्रिकेटपासून दूर होता.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

13 वेळा घडला 'तो' प्रकार

पुकोवस्कीची कारकिर्द ही सतत डोक्याला होणाऱ्या दुखापतींनी (कनकशन) भरली आहे. त्याला एकूण 13 वेळा आणि गेल्या आठ वर्षांमध्ये त्याला आठ वेळा बॉल लागला होता. टेस्ट क्रिकेट खेळल्यानंतरही त्याच्या खेळात तंत्राची कमतरता असल्याचं यामधून सिद्ध झालं होतं.

मार्च 2024 मध्ये शेफील्ड शिल्ड मॅचच्या दरम्यान रिले मेरेडिथचा बॉल पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला होता. त्यानंतर त्याला 'कनकशन'च्या कारणामुळे मैदान सोडावं लागलं. या घटनेनंतर तो संपूर्ण सेशन खेळू शकला नाही. लँकरशायरकडून कौंटी क्रिकेट खेळण्याचा करारही त्यानं रद्द केला. डॉक्टरांच्या पॅनलनं त्याला निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला.

Advertisement

पुकोवस्कीला मैदानात कधी-कधी लागला बॉल?

फेब्रुवारी 2017 - फिल्डिंग करताना डोक्याला दुखापत
ऑक्टोबर 2017 - क्विन्सलँडविरुद्ध हेल्मेटला लागला बॉल
नोव्हेंबर 2017 - टस्मानियाविरुद्ध हेल्मेटला लागला बॉल
मार्च 2018 : न्यू साऊथ वेल्सविरुद्ध बाऊन्सर लागला
डिसेंबर 2020 -  भारताविरुद्ध हेल्मेटला बॉल लागला
ऑक्टोबर 2022 - नेट प्रॅक्टिसच्या दरम्यान हेल्मेटला बॉल लागला
जानेवारी 2024 - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हेल्मेटला बॉल लागला
मार्च 2024 - पुन्हा हेल्मेटला बॉल लागला
 

Topics mentioned in this article