Paralympics 2024: अवनी लेखरानं रचला इतिहास, पॅरालिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पटकावले गोल्ड मेडल

Avani Lekhara Paralympics 2024: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Avani Lekhara Paralympics 2024: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. अवनी लेखरा या शूटरनं गोल्ड मेडल पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 स्पर्धेत अवनीनं गोल्ड मेडल पटकावलं. विशेष म्हणजे या गटात भारताच्या मोना अगरवालनं  ब्रॉन्झ मेडल पटकावतं संपूर्ण देशाला दुहेरी आनंद दिला आहे.

अवनीनं यापूर्वी टोक्योमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडलटी कमाई केली होती. त्यानंतर या ऑलिम्पिकमध्येही तिच्याकडून गोल्डची अपेक्षा होती. अवनीनं ही अपेक्षा पूर्ण करत गोल्ड मेडलची कमाई केली. 

अवनीनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 249.6 पॉईंट्स मिळवत ऑलिम्पिक रेकॉर्ड केला होता. पॅरिसमध्ये तिनं स्वत:चाच रेकॉर्ड मोडत 249.7 पॉईंट्सह गोल्ड मेडल पटकावलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Manu Bhaker : कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
 

अपघातानं बदललं आयुष्य

अवनी लेखरा राजस्थानच्या जयपूरमधील आहे. 2012 साली एका गंभीर कार अपघातामध्ये ती जखमी झाली होती. त्यानंतर तिच्या कंबरेच्या खालाच्या भागानं काम करणं बंद केलं होतं. पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी अवनी पहिली भारतीय आहे. तिनं यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक गोल्ड आणि एक ब्रॉन्झ मेडल जिंकत इतिहास रचला होता. 

यापूर्वी झालेल्या पात्रता फेरीत अवनी 625.8 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होती.  फायनल राऊंडमध्ये तिनं खेळ उंचावत गोल्ड मेडल पटकावले.
 


 

Topics mentioned in this article