Manu Bhaker Creates History : ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनू भाकरनं (Manu Bhaker) केलं आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली आहे. मनूनं रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकलं. भारताकडून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती पहिली महिला नेमबाज आहे. त्यापाठोपाठ मनू भाकर-सरबजोत सिंग जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम स्पर्धेच्या ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.
MANU BHAKER HAS CREATED HISTORY 🤩
— The Khel India (@TheKhelIndia) July 30, 2024
First Indian in Independent India history to win multiple medals at a single Olympic edition 🇮🇳♥️ pic.twitter.com/r7RooX5Uac
मनू भाकर-सरबजोत सिंग जोडीनं दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जीन जोडीचा 16-10 असा पराभव केला. अत्यंत चुरशीनं झालेल्या ब्रॉन्झ मेडलच्या या लढतीमध्ये दक्षिण कोरियन जोडीनं पहिला राऊंड जिंकला होता. त्यानंतर मनू आणि सरबजोत यांनी कमबॅक केलं. या दोघांनी 8-2 अशी आघाडी घेतली.
BREAKING: India WIN Bronze medal 🔥🔥🔥
— India_AllSports (@India_AllSports) July 30, 2024
Manu Bhaker & Sarabjot Singh beat Korean pair 16-10 in 10m Air Pistol Mixed team event to win India's 2nd medal in Paris. #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/G2XcZRgpoN
त्यानंतर दक्षिण कोरियन जोडीनं पुन्हा एकदा प्रतिकार करत ही आघाडी कमी केली. पण, त्यांना मनू -सरबजोत यांना मागं टाकता आलं नाही. अखेर मनू-सरबजोत जोडीनं विजयी लक्ष्य गाठत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.
( नक्की वाचा : पिस्तुलाने दिलेला धोका ते कांस्य पदक... मनू भाकरची दोन ऑलिम्पिकमधील कहाणी )
भारताचं या ऑलिम्पिकमधील हे दुसरं मेडल आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या चार दिवसात भारतानं दोन मेडलची कमाई केली असून ही दोन्ही मेडल्स शूटिंगमध्ये आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मेडलची मनू भाकर मानकरी आहे.
जगभरातील प्रमुख स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय शूटर्सकडून ऑलिम्पिकमध्ये नेहमी अपेक्षा असते. भारताला ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक गोल्ड शूटिंगमध्येच मिळालं होतं. अभिनव बिंद्रानं 2008 साली बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. पण, लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकनंतर भारताला आजवर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळलं नव्हतं. आता 12 वर्षांनी पॅरिसमध्ये भारतीय शूटर्सनी पुन्हा एकदा पदकाला गवसणी घातली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world