IPL 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यात आयुष म्हात्रे-वैभव सूर्यवंशी करणार धमाका, टीम इंडिया U19 जाहीर

India U-19 Team आयपीएल 2025 (IPL 2025) नंतर मुंबईकर आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि 14 वर्षांचा बिहारचा लाल वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
India U-19 Team Announced : इंग्लंड दौऱ्यासाठी U19 टीम इंडियाची घोषणा झाली आहे. (फोटो - BCCI)
मुंबई:

India U-19 Team Announced vs ENG Series: आयपीएल 2025 (IPL 2025) नंतर मुंबईकर आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि 14 वर्षांचा बिहारचा लाल वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आयुष म्हात्रेची पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील (Under-19) टीमचा कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच वैभवचीही या टीममध्ये निवड करण्यात आलीय. 24 जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात एक 50 ओव्हर्सचा सराव सामना, त्यानंतर पाच वन-डे मॅचची सीरिज आणि  19 वर्षांखालील इंग्लंडच्या टीमविरुद्ध  चार दिवसांचे दोन सामने खेळले जाणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

IPL ची कामगिरी निर्णायक

वैभव सूर्यवंशीची या टीममध्ये निवड त्यानं आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर झाली आहे.  बिहारमधील समस्तीपूरच्या वैभवनं आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड केलाय. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध 35 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली. ही आयपीएल इतिहासातील दुसरी वेगवान सेंच्युरी आहे. 

वैभवने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने आणि सहा लिस्ट ए सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी कोणत्याही सामन्यात त्याने सेंच्युरी झळकावले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया अंडर 19 टीम विरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत सूर्यवंशीने शतक ठोकले होते.

Advertisement

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली )

दुसरीकडे, सतरा वर्षांच्या आयुष म्हात्रेने नऊ फर्स्ट क्लास आणि सात लिस्ट ए सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 962 रन्स केले आहेत. या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. ऋतुराजच्या जागेवर आयुषची टीममध्ये निवड करण्यात आली. 

Advertisement

मुंबईचा विकेट किपर बॅटर अभिज्ञान कुंडूची व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. 

इतर लक्षवेधी खेळाडू

केरळचा लेग स्पिनर मोहम्मद एनानची निवडही लक्षवेधी आहे, ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील संघाविरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. एनानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन युवा कसोटी सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला होता. पंजाबचा ऑफ स्पिनर अनमोलजीत सिंग, त्या सीरिजमध्ये 9 विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याचीही टीममध्ये निवड करण्यात आली आहे.  

Advertisement

( नक्की वाचा :  Rohit Sharma : रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीचं कारण उघड, BCCI नं फेटाळली होती 'ती' मागणी! )

इंग्लंड दौऱ्यासाठी U19 टीम इंडिया

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू ( व्हाईस कॅप्टन आणि विकेट किपर), हरवंश सिंग (विकेटकिपर), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युद्धजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.

राखीव खेळाडू:

नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोल (विकेट किपर).
 

Topics mentioned in this article