जाहिरात

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीचं कारण उघड, BCCI नं फेटाळली होती 'ती' मागणी!

Rohit Sharma Test retirement Reason: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीचं कारण उघड, BCCI नं फेटाळली होती 'ती' मागणी!
मुंबई:

Rohit Sharma Test retirement Reason: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी त्यांना एक निरोपाचा सामना मिळायला हवा होता, असं मत फॅन्सनं व्यक्त केलं. ण बीसीसीआयने (BCCI) तसे केले नाही. बीसीसीआयच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. आता रोहितच्या निवृत्तीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

स्काय स्पोर्ट्सच्या (Sky Sports) एका रिपोर्टनुसार, रोहित शर्माने बीसीसीआयसमोर माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची पद्धतीचे अनुकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, बीसीसीआयनं तो प्रस्ताव फेटाळला. धोनीनं 2014 साली रताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहितलाही इंग्लंडविरुद्धच्या सीरिजदरम्यानच निवृत्ती घ्यायची होती.

रोहितने इंग्लंडला जाऊन सुरुवातीच्या काही मॅचमध्ये टीमचं नेतृत्व करण्याची आणि त्यानंतर सीरिजदरम्यानच निवृत्तीची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने नेतृत्वात सातत्य राखण्याची गरज असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली

( नक्की वाचा :  Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली )

रिपोर्टनुसार, बीसीसीआयची रोहितला सीरिजमध्ये खेळण्याची संधी देण्याची इच्छा होती. या रिपोर्टनुसार 'निवड समितीला सीरिजमध्ये सातत्य हवे होते. रोहित शर्माला सीरिजमध्ये खेळण्याची संधीही द्यायची होती, पण कॅप्टन म्हणून नाही.' त्याच कारणामुळे अखेरीस रोहितने स्वतःला टेस्ट क्रिकेटपासून दूर करण्याचा निर्णय घेतला.

कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन?

निवड समिती लवकरच टीम इंडियाच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनची घोषणा करणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताच्या पुढील कॅप्टनच्या निवडीबाबत अनिश्चितता आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) शर्यतीतून बाहेर झाल्याच्या वृत्तानंतर, अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) नेतृत्वाखालील निवड समिती आता ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या नावांवर चर्चा करत आहे. आयपीएलनंतर निवड समिती नवीन कॅप्टन आणि टेस्ट सीरिजसाठी टीमची घोषणा करणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com