अध्यक्षपदाच्या लालसेपोटी बबिताने आंदोलन पेटवले, साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ

साक्षी मलिकने सांगितले की बबिताने अनेक पैलवानांना एका बैठकीसाठी बोलावले होते.  या बैठकीमध्ये तिने कुस्ती महासंघात सुरू असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराविरोधात तसेच वाईट वर्तणुकीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

ऑलिम्पिकपटू साक्षी मलिक (Sakshi Malik)  हिने भाजप नेता आणि पैलवान बबिता फोगाटवर (Babita Phogat) गंभीर आरोप केला आहे. बबितानेच इतर पैलवानांना बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात भडकावले होते असे साक्षी हिने म्हटले आहे. बबिताला कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद हवे होते ज्यासाठी तिने हे आंदोलन पेटवले होते असं साक्षीने म्हटले आहे. साक्षी मलिकने सांगितले की बबिताने अनेक पैलवानांना एका बैठकीसाठी बोलावले होते.  या बैठकीमध्ये तिने कुस्ती महासंघात सुरू असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराविरोधात तसेच वाईट वर्तणुकीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. 

नक्की वाचा : घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर!

भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावा

पैलवानांनी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता असे म्हटले जाते. याबद्दल साक्षीला विचारले असता तिने सांगितले की या आंदोलनाला भाजपच्या दोन नेत्यांनी परवानगी मिळवून देण्याचे काम केले होते. बबिता आणि तीरथ राणा यांनी हरियाणामध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनासाठीची परवानगी या नेत्यांनी मिळवून दिली होती असे साक्षीचे म्हणणे आहे.  साक्षीने पुढे म्हटले की आंदोलन पूर्णपणे बबितामुळे प्रभावित झालेले नव्हते आणि आम्ही तिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवलेला नव्हता. कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केले जात असून त्यांची छलवणूक केली जात असल्याचे आम्हाला माहिती होते, एका महिलेच्या हाती जर महासंघाचे नेतृत्व गेले तर महासंघात सकारात्मक बदल होती असे आम्हाला वाटत होते असे साक्षीने म्हटले आहे. जर हे नेतृत्व बबितासारख्या अनुभवी खेळाडूने केले असते तर अधिक चांगले होते असे आम्हाला वाटत होते असे साक्षीने म्हटले आहे. 

नक्की वाचा :'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई

बबिताच्या डावपेचांबद्दल अनभिज्ञ होतो

बबिताबद्दल बोलताना साक्षी हिने म्हटले की आम्हाला वाटले होते की ती देखील आमच्यासोबत आंदोलनाला बसेल आणि इतर पैलवानांप्रमाणे अन्यायाविरोधात आवाज उठवेल. बबिताला आम्हाला होत असलेला त्रास ठाऊक असावा असे आम्हाला वाटत होते, त्यामुळे आम्ही हा कधी विचारच केला नव्हता की बबिता आमच्यासोबत असे डावपेच खेळेल. 

बृजभूषण यांचे दावे फोल ठरले

बृजभूषण यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करणारे नष्ट झालेत असे म्हटले होते. साक्षीने सिंह यांना उत्तर देताना म्हटले की असे काहीही झाले नाही,उलट  हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाटला यश मिळाले, विनेश ऑलिम्पिकला देखील गेली आणि मजबूत प्रतिस्पर्ध्याला तिने पराभूत केले. जर विरोध करणारे नष्ट झाले असले तर विनेशला ऑलिम्पिकमध्ये कोणी भाग घेऊ दिला असता ? असा सवाल साक्षीने विचारला आहे.  
  

Topics mentioned in this article