न्यूझीलंड विरुद्ध नुकत्याच संपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 0-3 असा धक्कादायक पराभव झाला. भारतीय क्रिकेट टीमनं 2012 नंतर पहिल्यांदाच मायदेशात टेस्ट सीरिज गमावली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या सीरिजमध्ये टीम इंडियाला एकही मॅच जिंकता आलेली नाही. या पराभवाचे पडसाद भारतीय क्रिकेटमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर भारतीय टीम 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशिपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही देशांमध्ये होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मोठ्या फरकानं जिंकणे टीम इंडियाला आवश्यक आहे. भारतीय टीमला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची फायनल गाठण्यास अपयश आलं, तर टीम इंडियामध्ये मोठे बदल आगामी काळात होऊ शकतात. बीसीसीआयनं त्या विषयावर काम करण्यास सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचं अपयश हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. टीम इंडियाचे हे दोन सीनिअर खेळाडू संपूर्ण सीरिजमध्ये फेल गेले. रोहित आणि विराटसह आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा हे चार भारतीय क्रिकेट टीममधील सीनिअर खेळाडू आहेत. या चौघांचंही टेस्ट टीममधील भवितव्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अवलंबून आहे.
( नक्की वाचा : Rishabh Pant : ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय का घेतला? उघड झालं कारण )
वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियातही भारतीय टीम अपयशी ठरली तर या चौघांची टेस्ट टीममधून हकालपट्टी होऊ शकते. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे, असं वृत्त 'फर्स्टपोस्ट' नं दिलं आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत वरिष्ठ खेळाडूंच्या एक्झिट प्लॅनवर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'फर्स्टपोस्ट' नं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 10 नोव्हेंबर रोजी रवाना होणार आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का? )
ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज अगदी तोंडावर आली आहे. त्याचबरोबर या सीरिजसाठी टीमची घोषणा यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे या दौऱ्यातील भारतीय टीममध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पण, ऑस्ट्रेलियातही मोठा पराभव झाल्यास टीम इंडियातील सीनिअर प्लेयर्सची ती शेवटची टेस्ट सीरिज ठरु शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे