IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये एक नवा वाद समोर आलाय. त्यामुळे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांची अडचण वाढू शकते. याबाबतच्या मीडिया रिपोर्टनुसार बंगला क्रिकेट असोसिएशननं (CAB) समलोचक हर्षा भोगले आणि सायमन डूलवर कोलकातामधील आयपीएल मॅचमध्ये कॉमेंट्री करण्यास बंदी घातली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं (CAB) बीसीसीआयला चिठ्ठी लिहून ही मागणी केलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी कोलकातामधील इडन गार्डन्स आणि पिच क्यूरेटर सुजान मुखर्जी यांच्यावर वक्ततव्य केलं होतं. कोलकाताचे क्युरेटरची केकेआरला हवं तसं पिच देण्याची तयारी नसेल तर केकेआरचे सामने कोलकाताच्या ऐवजी अन्य ठिकाणी करावेत, असं त्यांचं वक्तव्य होतं. या वक्तव्यावर बंगाल क्रिकेट असोसिएशननं आक्षेप घेतला आहे.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं स्पिन विकेट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कोलकाताचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं देखील इडन गार्डनची पिच स्पिनर्सला मदत करणारी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आपण बीसीसीआयच्या नियमानुसार पिच तयार करतो असं उत्तर सुजान मुखर्जी यांनी दिलं होतं.
त्यामुळे हर्षा भोगले आणि सायमन डूल यांच्यातील वाद आता चिघळत चाललाय. बीसीसीआय या प्रकरणात काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) हा सामना सोमवारी (21 एप्रिल) रोजी कोलकातामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आयपीएल 2025 ची फायनल देखील कोलकातामध्येच होईल.