Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुधवारी झालेल्या थरारक लढतील अफगाणिस्ताननं इंग्लंडचा 8 रन्सनं पराभव केला. इंग्लंडचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे 2019 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लिश टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अफगाणिस्तानच्या सेमी फायनलच्या आशा कायम आहेत.
कशी झाली मॅच?
लाहोरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये अफगाणिस्तानमं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 325 रन्स केले. अफगाणिस्तानकडून ओपनर इब्राहिम झाद्राननं 146 बॉल्समध्ये 177 रन्स केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. झाद्राननं त्याची सेंच्युरी 106 बॉलमध्ये पूर्ण केली होती. त्यानंतर त्यानं 146 बॉलमध्ये 12 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं 177 रन्स केले.
अनुभवी मोहम्मद नबीनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 24 बॉलमध्ये 40 रन्सची खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला 325 रन्सचा टप्पा गाठता आला.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा! कारण काय?)
जो रुटची सेंच्युरी व्यर्थ
326 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट 12 रन्स काढून आऊट झाला. आक्रमक बॅटिंगसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या इंग्लिश बॅटर्सना पहिल्या 15 ओव्हर्समध्ये एकही सिक्स लगावता आला नव्हता.
इंग्लंडकडून त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडू जो रुटनं (Joe Root) सेंच्युरी झळकावली. रुटनं 111 बॉलमध्ये 120 रन्स केले. रुटनं तब्बल 2083 दिवसांनी वन-डे मध्ये सेंच्युरी केली. कॅप्टन जोस बटलरनं 38 रन्सची महत्तवपूर्ण खेळी केली. तर जेमी ओव्हरटननं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 32 रन्स केले. जोफ्रा आर्चरनं 7 बॉलमध्ये 14 रन करत जोरदार प्रतिकार केला. पण, ते प्रयत्न अपूरे ठरले. अफगाणिस्तानकडून ओमरझाईनं 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडची संपूर्ण टीम 317 रन्सवर ऑल आऊट झाली.
यापूर्वी भारतामध्ये 2023 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताननं इंग्लंडचा खळबळजनक पराभव केला होता. इंग्लंडवरील तो विजय चमत्कार नव्हता, हे अफगाणिस्ताननं दाखवून दिलं आहे. आता अफगाणिस्ताननं सेमी फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल.