जाहिरात

Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा!

Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानच्या सेंच्युरीनंतर यजमान पाकिस्तानची पुन्हा एकदा थट्टा सुरु झाली आहे. 

Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा!
AFG vs ENG : इब्राहिम झाद्राननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रेकॉर्डब्रेक सेंच्युरी झळकावली आहे. (Photo - AFP)
मुंबई:

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आठवा सामना अफगामिस्तान विरुद्ध इंग्लंड (Afghanistan vs England) यांच्यात सुरु आहे. लाहोरमध्ये सुरु असलेला ग्रुप B मधील या सामन्यातील पराभूत टीम स्पर्धेतून बाद होणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 325 असा दमदार स्कोअर केला. ओपनर इब्राहिम झाद्रानची (Ibrahim Zadran) सेंच्युरी हे अफगाणिस्तानच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. अफगाणिस्तानच्या झाद्रानच्या सेंच्युरीनंतर यजमान पाकिस्तानची पुन्हा एकदा थट्टा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

झाद्रानची रेकॉर्डब्रेक सेंच्युरी

इब्राहिम झाद्राननं त्याच्या वन-डे करिअरमधील सहावी सेंच्युरी झळकावली. सेंच्युरीनंतरही त्याचा ओघ सुरुच होता. त्यानं 134 बॉलमध्ये 150 रन्स केले. झाद्रानं 146 बॉल्समध्ये 177 रन्सची खेळी केली. या खेळीत 12 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता.

झाद्रान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेंच्युरी करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरलाय. त्यानं यापूर्वी वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तित स्कोअरचा रेकॉर्डही झाद्राननं नोंदवला. यापूर्वी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या बेन डकेटच्या नावावर होता. डकेटनं याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 रन्स केले होते. 

( नक्की वाचा :  IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video )
 

पाकिस्तानची थट्टा का?

इब्राहिम झाद्राननं सेंच्युरी झळकावताच सोशल मीडियावर पाकिस्तानची थट्टा सुरु झाली आहे. वास्तविक ही मॅच अफगाणिस्तान आणि इंग्लंडमध्ये सुरु आहे. त्यानंतरही पाकिस्तानची थट्टा का सुरुय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर आम्ही देणार आहोत.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत 7 मॅचमध्ये 10 जणांनी सेंच्युरी लगावली आहे. या स्पर्धेत विल यंग, टॉन लॅथम, तौहिद ह्रदोय, शुबमन गिल, रायन रिकल्टन, बेन डकेट, जोश इंग्लिस, विराट कोहली यांनी सेंच्युरी झळकावलीय. या यादीमध्ये आता न्यूझीलंडचा रचिन रविंद्र आणि अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानचा समावेश झाला आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेत 7 टीमच्या खेळाडूंनी सेंच्युरी झळकावलीय. फक्त पाकिस्ताच्या एकाही खेळाडूला सेंच्युरी करता आलेली नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानांना एकही सेंच्युरी झळकावता आलेली नसल्यानं सोशल मीडियावर पाकिस्तानची थट्टा करण्यात येत आहे.

न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता बांगलादेशविरुद्ध गुरुवारी (27 फेब्रुवारी) रोजी होणारा सामना ही पाकिस्तानसाठी औपचारिकता आहे. आता शेवटच्या सामन्यात तरी पाकिस्तानचा कोणता खेळाडू सेंच्युरी झळकावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: