Champions Trophy 2025: गतविजेते ठरले 'शून्य'विजेते! यजमान पाकिस्तानची बेक्कार लाज गेली

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान पद असलेल्या पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नसल्याने अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड यजमानांच्या नावावर नोंद झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामधील सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यामुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला भोपळाही न फोडता पॅकअप करावे लागणार आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान पद असलेल्या पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नसल्याने अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड यजमानांच्या नावावर नोंद झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 60 धावांनी झालेल्या दारुण पराभवातून पाकिस्तानला कोणताही धडा घेता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 6  विकेट्सने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तान संघाला कुठेही आपला प्रभाव पाडता आला नाही. भारत आणि न्यूझिलंडविरुद्धचे दोन्ही सामन्यात पाकचा दारुण पराभव झाल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. मा

मात्र आज होणाऱ्या बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत उरली- सुरली अब्रु वाचवण्याची संधी पाकिस्तानकडे होती. हा सामना जिंकून पाकिस्तान विजयासह स्पर्धेतून बाहेर पडले असते. मात्र या सामन्यात पावसाने पाकिस्तानचा खेळ बिघडवला आणि हा सामना रद्द झाला. त्यामुळे आयसीसीशी वाद घालून मोठ्या दिमाखात स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या पाकला मोठ्ठा भोपळा घेऊन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. 

( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा! कारण काय?)

2002 पासून 6 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत यजमान देश सामना न जिंकता स्पर्धेचा शेवट करत आहे असे कधीही घडलेले नाही. 2002 मध्ये श्रीलंका यजमान होता. त्यावेळी ते भारतासोबत संयुक्त विजेते बनले. 2004 मध्ये इंग्लंड यजमान देश होता. इंग्लंडने गट फेरीत दोन्ही सामने जिंकले होते. तो अंतिम फेरीत पोहोचला, जिथे त्यांना वेस्ट इंडिजने पराभूत केले. 

Advertisement

 2006 मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान देश होता. या हंगामात भारत गटातून बाहेर पडला पण त्यांनी 3 पैकी 1 सामना जिंकला होता. यानंतर, 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2013 आणि 2017 मध्ये इंग्लंड यजमान देश होता. यामध्येही यजमान संघ एकही सामना न जिंकता बाहेर पडला असे झाले नाही.