Champions Trophy : 29 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेचा पहिल्याच दिवशी फ्लॉप शो, पाकिस्तानात काय चाललंय?

Champions Trophy, Pak vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मैदानात जे दिसलं ते पाहून क्रिकेट फॅन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून (19 फेब्रुवारी) कराचीमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात स्टेडियवर जे दिसलं त्यावर  क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

29 वर्षांनी स्पर्धा पण...

पाकिस्तानमध्ये यापूर्वीची आयसीसीची मुख्य स्पर्धा 1996 साली झाली होती. त्यानंतर तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसीची मुख्य स्पर्धा होत आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) या स्पर्धेसाठी मोठा खर्च केला आहे. सर्व स्टेडियम नवे बांधण्यात आले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेवरही मोठा खर्च करण्यात येत आहे.

( नक्की वाचा : Champions Trophy : Champions Trophy : पाकिस्तानची बिकट अवस्था! भारत-पाक मॅचपूर्वी PCB प्रमुखांवर आली भयंकर वेळ )

पण, हा सर्व अट्टहास ज्या क्रिकेट फॅन्ससाठी करण्यात आला आहे. त्यांनीच पहिल्या दिवशीच्या सामन्याकडं पाठ फिरवली आहे. कराचीमध्ये यजमान टीमची मॅच असूनही बहुतांश स्टेडियम रिकामं आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवानसह पाकिस्तानचे सर्व बडे स्टार्स या मॅचमध्ये खेळत आहेत. पण, प्रेक्षकांना त्यांचा खेळ मैदानात पाहण्याची इच्छा नाही, हेच पहिल्या दिवशी दिसलं आहे. 30,000 क्षमतेच्य़ा या स्टेडियममध्ये पहिला सामना पाहण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात जेमतेम 1500 प्रेक्षक उपस्थित आहेत. 

कराची स्टेडियमकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानं सोशल मीडियावर फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय. पाकिस्तानमध्ये इतकी मोठी स्पर्धा खेळवणं योग्य आहे का? असा प्रश्न फॅन्सनी विचारला आहे.

Advertisement

न्यूझीलंडची खराब सुरुवात

कराचीमधील सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डेव्हॉन कॉनवे 10 रन काढून आऊट झाला. तर अनुभवी केन विल्यमसन फक्त 1 रनवर परतला. डॅरेल मिचेललाही (10) मोठी खेळी करता आली नाही. ओपनर विल यंगनं एक बाजू लावून धरत हाफ सेंच्युरी झळकावली आहे. 
 

Topics mentioned in this article