
Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये 1996 नंतर पहिल्यांदाच आयसीसीची महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा होत आहे. आठ प्रमुख देशांचा सहभाग असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थात भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) सुरक्षेमुळे पाकिस्तानात जाण्यास नकार दिलाय. भारताचे सर्व सामने आता दुबईत होत आहे. प्रत्येक आयसीसी स्पर्धांचा अनिवार्य भाग असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan, Champions Trophy Match) सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सामन्याची सर्व तिकीटं लगेच विकली गेली. क्रिकेट फॅन्समध्ये या मॅचसाठी उत्साहाचं वातावरण आहे. पण, त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नकवी ( PCB Chief Mohsin Naqvi ) यांच्यावर कुणीही कल्पना केली नसेल अशी वेळ आली आहे.
मोहसीन नकवी हा सामना पाहण्यासाठी दुबईला जाणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी दुबईला जाणार आहे. नकवी यांना या मॅचसाठी 30 सीटच्या व्हीआयपी बॉक्सची ऑफर मिळाली होती. पीसीबी प्रमुखांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती आणि कुटुंबीयांसोबत सामना पाहावा म्हणून हा बॉक्स त्यांना मिळणार होता. पण, नकवी या बॉक्सची सर्व तिकीटं विकण्याचा निर्णय घेतला आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानची पुन्हा गेली जगासमोर लाज, घडला भयंकर प्रकार! Champions Trophy कशी होणार? पाहा Video )
नकवी आता क्रिकेट फॅन्ससोबत स्टँडमध्ये बसून सामना पाहणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पैसे मिळावेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुबई स्टेडियममधील या व्हीआयपी बॉक्सची किंमत 4 लाख अमेरिकन डॉलर (3.47 कोटी रुपये) आहे. नकवी यांनी हा पैशांसाठी हा निर्णय का घेतला? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडं पुरेसा पैसा नाही का? पीसीबी प्रमुखावर व्हीआयपी बॉक्सचे तिकीट विकण्याची वेळ का आली? पुरेसा पैसा नसेल तर मोठ्या स्पर्धा आयोजन करण्याचा हट्ट पीसीबीनं का केला? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात 1998 साली झाली. 2017 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. 2017 मधील फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. या पराभवाचा बदला घेण्याची टीम इंडियाला 23 तारखेला दुबईमध्ये मोठी संधी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world