जाहिरात

Bengaluru stampede : हजारोंची गर्दी, लाठीचार्ज आणि पाऊस...RCB च्या विजयोत्सवात कशी झाली चेंगराचेंगरी? Video

Chinnaswamy Stadium Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या विजयोत्सवाताला गालबोट लागलं आहे.  या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहूया प्रमुख मुद्दे....

Bengaluru stampede : हजारोंची गर्दी, लाठीचार्ज आणि पाऊस...RCB च्या विजयोत्सवात कशी झाली चेंगराचेंगरी? Video
RCB Victory Parade Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत फॅन्सनी एकमेकांना सावरलं.
मुंबई:

Chinnaswamy Stadium Stampede: तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनं (RCB) मंगळवारी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीची विजय परेड आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परेडपूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यात एका महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 50  जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या विजयोत्सवाताला गालबोट लागलं आहे.  या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रमुख मुद्दे वाचा.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबोट लागलं आहे बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) च्या विजय परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाले. गर्दीत एक लहान मूलही बेशुद्ध पडले, ज्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर घडली.

आरसीबीचा संघ विजयाचा जल्लोष करत होता. त्यावेळी हजारो फॅन्स तिथे उपस्थित होते. ते आयपीएल 2025 च्या विजेता संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्याचवेळी गर्दीत अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली.

चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटजवळ ही चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीच्या विजय परेडसाठी फॅन्सची मोठी गर्दी जमली होती. गर्दी नियंत्रणादरम्यान पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

याच दरम्यान हलका पाऊसही सुरू झाला. पावसामुळे लोक इकडे तिकडे धावू लागले. पावसानंतर काही वेळाने चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य गेटजवळ चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली.

( नक्की वाचा : Bengaluru stampede : RCB च्या विजेतेपदाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, पाहा Video )

यानंतर चेंगराचेंगरीशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात जखमींना रुग्णालयात घेऊन जाणारे लोक आणि चेंगराचेंगरीत पडलेल्या लोकांना सीपीआर देणारे स्थानिक लोकही दिसले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मी अद्याप मृतांची किंवा जखमींची नेमकी संख्या निश्चित करू शकत नाही, परंतु मी घटनास्थळी जात आहे.'

चेंगराचेंगरीच्या परिस्थितीनंतर तातडीच्या सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामागे आयोजकांची निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील चूक हे कारण सांगितले जात आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com