माजी क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा बनला मुलगी! ट्रान्सफॉर्मेशन VIDEO सोशल मीडियावर Viral

आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो आहेत. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतर काही चित्रे देखील आहेत. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने त्याचे लिंग बदलल्यामुळे तो मुलापासून मुलगी बनला आहे. आर्यन हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन आणि लिंग बदलानंतर अनाया बनला आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास शेअर केला आहे.

आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो आहेत. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतर काही चित्रे देखील आहेत. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे.

(नक्की वाचा-  KL Rahul Athiya Shetty: केएल राहुल लवकरच होणार बाबा, आथिया शेट्टीनं दिली गुड न्यूज)

आर्यन पासून अनाया म्हणजेच मुलगी बनल्यानंतर तो खूप आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे. जो माझ्या स्वतःच्या शोधाशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.

(नक्की वाचा- गोमांस खाऊ घातलं, मुस्लीम नाव दिलं, Mrs. India Galaxy 2024 रिनीमा बोरानं सांगितला 'लव्ह जिहाद'चा अनुभव)

माझी आवड, माझं प्रेम असलेला खेळ सोडून देण्याचा विचार मी कधीच केला नाही. पण इथे मी एका वेदनादायक वास्तवाला सामोरे जात आहे. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) वर एक ट्रान्स वुमन म्हणून, माझ्या शरीरात आमूलाग्र बदल झाले आहेत. मी माझ्यातील अॅथलेटिक क्षमता गमावत आहे, ज्यावर मी अवलंबून होतो. मला खूप दिवसांपासून आवडणारा खेळ माझ्यापासून दूर जात आहे, असं आर्यनने म्हटलं आहे. 

Advertisement

आर्यनचा क्रिकेटमधील प्रवास

आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो. याशिवाय त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत. आर्यन सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहतो. तिथल्या काऊंटी क्लबसाठी  क्रिकेटही खेळतो.

Topics mentioned in this article